आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिलाचा धनादेश न वटल्यास 590 रुपये दंड :दंडाच्या रकमेवर जीएसटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - बिल भरण्यापोटी  ग्राहकांनी दिलेला धनादेश न वाटल्यास वीज वितरण कंपनीने संबंधित ग्राहकांना ५९० रुपये दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला आपला धनादेश केवळ वेळ मारून नेण्यासाठी देणाऱ्या ग्राहकांना चांगलाच दणका बसणार आहे. 
वीज वितरण कंपनीकडून ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांनी ऑनलाइन वीज भरणा केल्यास ग्राहकांना प्रत्येक देयकावर ०.२५ टक्के एवढी सूट दिली जात आहे.

 

ग्राहकांना वीज वितरण कंपनीने त्यांच्या काउंटरवर आणि बँकेत सुद्धा बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु काही ग्राहक केवळ वेळ मारून नेण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे धनादेश देऊन आपले बिल भरत असतात. परंतु धनादेश न वटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून केवळ वेळ मारून नेण्यासाठी धनादेश देणाऱ्या ग्राहकांना वीज वितरण कंपनीने सुद्धा दणका दिला आहे. यापूर्वी धनादेश न वटल्यास ३५० रुपये दंड  होता. आता त्यात वाढ करून ५०० रुपये असा दंड करण्यात आला असून या  रकमेवर १८  टक्के जीएसटी सुद्धा लावण्यात येणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला चेक बाउन्स झाल्यास ५९० रुपये दंड भरावा लागणार आहे.

 

नांदेड परिमंडळात ऑनलाइन व्यवहार वाढले
मोबाइलचा वापर करून वीज बिल भरणा करण्याचे प्रमाण वाढले असून  नांदेड परिमंडळात सुद्धा याचा वापर वाढला. या परिमंडळात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ९४ कोटी २५ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त ऑनलाइन भरणा नांदेड जिल्ह्यातील ग्राहकांनी केला असून त्याचा आकडा ५८ कोटी ७१ लाख रुपये एवढा आहे. परभणी जिल्ह्यातील ग्राहकांनी १९ कोटी ३४ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने भरणा केला.

बातम्या आणखी आहेत...