पाली- राजस्थानच्या पालीमध्ये जैन संत रूपमुनी यांच्या महाप्रयाण यात्रेत रविवारी हजारो भाविक सहभागी झाले. जैन मुनींना खांदा देण्यापासून मुखाग्नी देण्यापर्यंत प्रत्येक बाबीसाठी बोली लावण्यात आली. यातही जैन लोकांनी अत्यंत श्रद्धापूर्वक सहभाग घेतला. यात अंत्यसंस्कारासाठी तब्बल ८ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. दुपारी १ वाजता हे अंत्यसंस्कार करण्यात आले. याशिवाय मुखाग्नीसाठी एका भक्ताने १.९४ कोटी रुपयांची बोली लावली.