ACB Raid / कोल्ड-ड्रिंक दुकानाची परवानगी देण्यासाठी तहसीलदाराने मागितली 8 लाखांची लाच; एसीबीने छापा मारला असता घरातून मिळाले कोट्यावधींचे घबाड

तहसीलदाराच्या ऑफीस आणि घरातून मिळाले 93 लाख रुपये रोख आणि दागिने
 

दिव्य मराठी वेब

Jul 11,2019 03:23:37 PM IST

हैदराबाद - तेलंगाणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील एका तहसीलदाराच्या घर आणि ऑफिसमध्ये छापेमारी दरम्यान 93 लाख रुपये रोख आणि दागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार लाख रुपयांची लाख घेण्याच्या आरोपाखाली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. एसीबीने बुधवारी रात्री केशमपेटचे तहसीलदार व्ही.लावण्या यांच्या घर आणि ऑफिसमध्ये छापा मारला होता. मिळालेली रोख रक्कम मोजण्यासाठी मशीनचा आधार घ्यावा लागला होता.

तक्रारकर्ता ममीदिपल्ली भास्कर याने आरोप केला आहे की, कोल्ड ड्रिंकचे दुकान सुरु करण्याची परवानगी देण्यासाठी तहसीलदाराने 8 लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने तहसीलदाराच्या ठिकाणांवर छापे मारत या लाच प्रकरणाचे भांडाफोड केले. आठ रुपयांतील पाच लाख तहसीलदार आणि 3 लाख ग्राम महसुल अधिकाऱ्याला मिळणार होते. तक्रारदाराने दिलेले चार रुपये देखील तहसीलदाराच्या घरातून जप्त करण्यात आले आहे.

X
COMMENT