आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आपसांत वाद केल्याने कोणाचाही लाभ होणार नाही', मोहन भागवतांचा भाजप-सेनेला सल्ला  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संघ प्रमुखांनी मानवी स्वार्थावर चिंता व्यक्त केली

नागपूर- राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप-सेना यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. आपापसात भांडल्याने दोघांचेही नुकसान होते. हे सर्वच जाणतात. परंतु हे माहिती असूनही माणूस जे करायला पाहिजे ते न करता जे करायला नको तेच करतो, असे सूचक वक्तव्य रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. आंतरराष्ट्रीय प्राचार्य‌‌‌ शिक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. 

पुढे ते म्हणाले की, "सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत दरी निर्माण झाली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना मिळूनही सरकार स्थापन करू शकलेले नाही. अहंकारामुळे कोणी कोणाशी बोलायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. भौतिक जगात अहंकारामुळे माणूस विचार करू शकत नाही. मी आणि माझ्या पलिकडे जाऊन विचार करीत नाही. मात्र शिक्षणामुळे हा विवेक येतो, असे ते म्हणाले." मध्यंतरी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपाला झोडपून काढले. भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. सत्ता स्थापन न होण्याच्या भीतीने ते तसे बोलल्याचे सांगितले जाते. त्यावरही सरसंघचालकांनी सूचक वक्तव्य केले. भीतीमुळे माणूस बोलायला नको ते बोलतो आणि करायला नको तेच करतो, ते म्हणाले. लेजेंड व्यक्तीलासुद्धा विनयशील व्हावेच लागते, हे वक्तव्य चर्चेत आहे.

बातम्या आणखी आहेत...