आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • "RSS Is A Terrorist Organization, I Have Evidence", Said Babasaheb Ambedkar's Great Grandson Rajaratna Ambedkar

''आरएसएस एक दहशतवादी संघटना, माझ्याकडे पुरावे आहेत', डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकरांचा गंभीर आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'यांच्या संघटनेचे लोक दहशतवादी कारवायांमध्ये पकडले जात आहेत'

बंगळुरू- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर दहशतवादी संघटना असल्याचे आरोप केले आहेत. काल(रविवार) कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले की, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेला बंद करायला हवे. माझ्याकडे पुरावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजुला एक साध्वी बसल्या होत्या आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाल्या की, भारतीय लष्कराकडील शस्त्र साठा जेव्हा संपला होता, तेव्हा आरएसेसने त्यांना तो सर्व शस्त्रसाठा पुरवला होता."

''मी यांना विचारतो की, एवढा आरएसएसकडे इतका मोठा शस्त्रसाठा कुठून आला, इतक्या बंदुका कुठून आल्या? पंतप्रधानांच्या बाजुला बसून या साध्वी वक्तव्य करतात. एखाद्या घरात बॉम्ब मिळाला असेल, तर त्या घराला किंवा घरातील सदस्यांना दहशतवादी ठरवले जाते. त्यामुळे अशा संघटनेकडे इतका शस्त्रसाठा असले, तर त्या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले जाऊ शकत नाहा का? यांच्या संघटनेतील लोक आज दहशतवादी कारवायांमध्ये पकडले जात आहेत, अशा संघटनेला जगभरात बॅन करायला हवं," असं यावेळी राजरत्न आंबेडकर म्हणाले.