आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या मनात 'काही' असते तर ते मला बोलले असते : भागवत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फार स्वच्छ स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही इच्छा असेल तर सर्वात आधी ते मला बोलले असते किंवा बोलतीलही. षड‌्यंत्र करणाऱ्यांपैकी ते नाहीत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. डेहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, २०१४ मध्ये राममंदिराचा मुद्दा नसता तरी सरकार स्थापन झाले असते, पण २०१९ मध्ये राममंदिर सर्वात आवश्यक मुद्दा आहे. भगवान राम सर्वांना प्रिय आहेत. त्यामुळे मंदिर उभारणे गरजेचे आहे. मंदिर झाले नाही तर संतांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. 


आरक्षणाबाबत काय म्हणाले भागवत? 
कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, मी नेहमी आरक्षणाच्या बाजूने आहे, पण आरक्षण जाती-धर्माच्या आधारावर नव्हे तर गरजू लोकांना मिळायला हवे. यापूर्वीही भागवत यांनी आरक्षणावर अनेकदा मत मांडले आहे. आरक्षणाच्या आडून राजकारण होत असल्याने हीच मोठी समस्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...