आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठला, हाच खरा अपराधी..! उद्धव ठाकरेंना बोलण्याचे भान नाही, जनताच फळ देईल; संघाची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नागपूर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाने 'तरुण भारत'मधून खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येनंतर पंढरपूरमध्ये मोठी सभा घेतली. दोन्ही सभांमध्ये त्यांनी राम मंदिरावरुन भाजपला लक्ष्य केले होते. त्यावर 'विठ्ठला, हाच खरा अपराधी..!' या शीर्षकाखाली अग्रलेखात संघाने उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे.  उद्धव ठाकरेंना बोलण्याचे भान नाही, आगामी निवडणुकांमध्ये जनताच त्यांना फळ देईल, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

 

उद्धव टाकरेंना काय बोलावे, काय बोलू नये, आपण काय करत आहोत, काय करायला हवे, भान राहिलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे सरकारला चोर म्हणतात. याचा अर्थ ते स्वत:च्या मंत्र्यांनाही आणि पक्षालाही चोर म्हणत आहेत. आपण काय करतोय हे जनतेला कळत नाही, असा त्यांचा समज झाला आहे. परंतु आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांना धुळीत मिळवल्याशिवाय राहणार नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.

 

'पहारेकरी चोर आहे', असे बोलून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिळसळला. तसेच पंतप्रधानपदाचा अवमान केला. यावरून ते राजकारणात किती अपरिपक्व आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहेत. सत्ता सोडण्याची शिवसेनेत हिम्मतही नाही, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...