पाकिस्तान / रा. स्व. संघाची विचारसरणी नाझीवादी; ३७० हटवल्यानंतर इम्रान खानची पुन्हा टीका

लाहोहमध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड 
 

वृत्तसंस्था

Aug 12,2019 10:32:00 AM IST

इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरचा दर्जा काढल्यानंतर आता भारत काश्मिरींवर दमन नीतीचा वापर करेल. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण नाझी विचारसरणीवरून प्रेरित अाहे, अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर पुन्हा टीका केली.


काश्मीरच्या भूभागात बदल करून भारताने चूक केली आहे, असे इम्रान यांनी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी ही टीका केली. ही हिटलरशाही जग नुसतेच पाहणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आरएसएसचे तत्त्वज्ञान हे हिंदू सर्वश्रेष्ठ आहेत, असे आहे. नाझींना आर्य श्रेष्ठ वाटायचे. ही गोष्ट थांबायला नको का? या विचारसरणीतून मुस्लिमांचे दमन होईल. त्याचबरोबर पाकिस्तानलादेखील लक्ष्य करण्याचे प्रयत्न होतील, असा दावा इम्रान यांनी केला. भारताने मात्र जम्मू-काश्मीर हा अंतर्गत विषय आहे. त्यात हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे निक्षून सांगितले आहे. ४ आॅगस्ट राेजी भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याला केंद्रशासित प्रदेश असा दर्जा िदला.


त्या पार्श्वभूमीवर खान यांनी भारतविराेधी आग आेकली आहे. काश्मीर प्रश्नी बदललेल्या परिस्थितीबद्दल मी चीनला अवगत केले आहे. हा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळापुढे मांडण्यात यावे, अशी मागणी आम्ही चीनकडे केल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी रविवारी इस्लामाबादेत सांगितले. कुरेशी यांची शनिवारी त्यांचे समकक्ष वँग यी यांच्याशी या मुद्यावर चर्चा झाली. या मुद्यावर पूर्ण पाठिंबा द्यावा, असा आग्रह आम्ही चीनच्या नेतृत्वाकडे केला हाेता. चीनने आम्हाला पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिल्याचा दावा कुरेशी यांनी केला.

इस्लामाबामहाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये अलीकडेच स्थापन झालेल्या महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची शनिवारी रात्री दोन जणांनी तोडफोड केली.

या प्रकरणातील आरोपी मौलाना खैरम रिझवी हा तेहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान या संघटनेचा सदस्य असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात ईशनिंदा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यावरून हा तरूण नाराज होता, असे सांगण्यात आले. याचवर्षी जूनमध्ये लाहोर किल्ल्याच्या परिसरात नऊ फूट उंचीच्या महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. प्रशासनाने या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करून ईदनंतर या पुतळ्याची दुरूस्ती केली जाईल.

X
COMMENT