Home | Maharashtra | Mumbai | RSS to organize Hunkar Rally for demand of Ram Mandir

राम मंदिरासाठी संघाचा 'हुंकार', नागपुरात रॅली काढण्याचा निर्णय, त्यानंतर अयोध्या आणि नवी दिल्लीतही काढणार रॅली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 05:04 PM IST

मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

  • RSS to organize Hunkar Rally for demand of Ram Mandir

    मुंबई - आगामी निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसा राम मंदिराचा मुद्दाही तापायला लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही राममंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच संघाने आता देशभरामध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावर हुंकार रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात नागपूरमधून होणार आहे.

    संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात एक बैठक आयोजित करण्यात आली. त्यात यासंबंधी निर्णय घेण्यात आला. राम मंदिराच्या मुद्द्यावर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हुंकार रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून याची सुरुवात होणार असून त्यानंतर अयोध्या, बेंगळुरू, नवी दिल्ली याठिकाणीही हुंकार रॅलींचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.

Trending