आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटना केवळ सरकार बनवण्यापुरते मर्यादित नाहीत. राष्ट्र निर्माणसाठी त्यांचे कार्य अधिक महत्वाचे आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यक्रमात ते बोलत होते. आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. हे सरकार बनवणे, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनवण्यापर्यंत मर्यादित नाही. यात राष्ट्रनिर्माण अधिक महत्वाचे आहे." गडकरींनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत थेट काहीच म्हटले नाही. परंतु, आमच्यासाठी विचारसरणी अत्यावश्यक आहे आणि त्याही पेक्षा वैयक्तिक संबंध गरजेचे आहेत असे ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी समोर आले. यात एकत्रित निवडणूक लढवणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट बहुमत देखील मिळाले. परंतु, मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला आणि सरकार स्थापनेला विलंब झाला. यानंतर 12 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. भाजपकडे सध्या 105, शिवसेनेकडे 56 आमदार आहेत. अशात शिवसेना, राष्ट्रवादी (54) आणि काँग्रेस (45) एकत्रित येऊन सत्ता स्थापनेचे प्रयत्न करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.