Home | Maharashtra | Vidarva | Akola | RSS volunteer works for culture

संघाचा स्वयंसेवक संस्कृती शेवटच्या घटकापर्यंत रुजवण्यात प्रयत्नशील

प्रतिनिधी | Update - Aug 24, 2018, 01:29 PM IST

संघ ही विचारधारा असून, देश व समाज रक्षणाकरीता राबवल्या जाणारी वैचारिक चळवळ आहे. त्या अनुषंगाने संघाचा स्वयंसेवक संस्कृती

  • RSS volunteer works for culture

    मलकापूर- संघ ही विचारधारा असून, देश व समाज रक्षणाकरीता राबवल्या जाणारी वैचारिक चळवळ आहे. त्या अनुषंगाने संघाचा स्वयंसेवक संस्कृती व संस्कार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रुजवण्याकरिता प्रयत्नशील असते. या कार्यशैलीमुळेच अनेक घटक मुख्यत्वे करून व्यावसायिक तरुण वर्ग आज संघाच्या विचारधारेशी मोठ्या प्रमाणात जुळत आहेत, अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्य या पश्चिम क्षेत्राचे प्रचार व प्रसार प्रमुख प्रमोद बापट यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केल्या.


    प्रचार व प्रसार प्रमुख प्रमोद बापट हे २२ ऑगस्ट रोजी मलकापूर नगरीत आले होते. दरम्यान, प. पु. बाळासाहेब देवरस स्मृतीभवन येथे त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. या वेळी तालुका संघ चालक विनायकराव पाटील व नगर संघचालक दामोदर लखानी प्रामुख्याने उपस्थित होते. संघाची विचारसरणी व स्वयंसेवकांची कार्यशैली यावर भाष्य करताना प्रमोद बापट यांनी विविध पैलूंचा उलगडा केला. त्याचप्रमाणे पत्रकार बांधवांकडून समाजातील उपेक्षित व वंचिताला वृत्ताद्वारे न्याय देण्याचा किंबहुना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे या बाबत समाधान व्यक्त करीत पत्रकारांच्या कार्याचे मुक्तपणे कौतुकही केले. तर सद्यःस्थितीत मीडिया संघकार्याची दखल घेऊ लागले आहे असे भाष्य केले. तसेच केरळमधील संघकार्याविषयी माहिती दिली.

Trending