अवैध बांधकामांविरुद्ध मोहीम; / अवैध बांधकामांविरुद्ध मोहीम; शिवणे येथील आरटीआय कार्यकर्त्याची पुण्यात हत्या 

Feb 13,2019 08:00:00 AM IST

पुणे- शिवणे परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट (३२) यांची अपहरण करून हत्या झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ५ फेब्रुवारीपासून शिरसाट बेपत्ता होते. शिरसाट कुटुंबाचे राजकीय पक्ष आणि बांधकाम व्यावसायिकांशी संबंध होते. वडगाव धायरी, शिवणे आणि परिसरातील अवैध बांधकामांविरुद्ध शिरसाट यांनी आरटीआयच्या माध्यमातून आवाज उठवला होता. शिवणे येथील उत्तमनगर परिसरात शिरसाट वास्तव्यास होते.

५ फेब्रुवारीला काही जणांसोबत ते बाहेर पडले. मात्र, घरी परतलेच नाहीत. त्यांच्या बंधूंनी तशी तक्रार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी शिरसाट यांचे मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता मुठा नदीजवळ ते लोकेट झाल्याने तेथे शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सकाळी पिरंगुट ते लवासा या मार्गावर ताम्हिणी घाटात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

X