आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rucks On Third Day In Parliament; Opponent On Home Minister Amit Shah's Resignation

संसदेत तिसऱ्या दिवशीही गोंधळ; गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • गोंधळामुळे आतापर्यंत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही

नवी दिल्ली- दिल्लीतील हिंसाचारावर चर्चा करणे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार गोंधळ घातला. यामुळे राज्यसभेचे कामकाज सकाळी आणि लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेनंतर स्थगित करावे लागले.


विरोधकांच्या गोंधळामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. मात्र, गदारोळातच लोकसभेत प्रत्यक्ष कराबाबतचे विधेयक बुधवारी मंजूर करण्यात आले.

बुधवारी लोकसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित केल्यानंतर भोजन काळानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. दोन्ही सभागृहांत आतापर्यंत एकही दिवस प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर होऊ शकला नाही. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघमसह जवळपास सर्वच विरोधी सदस्य उभे राहिले व दिल्लीतील हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी करू लागले. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, सरकार होळीनंतर दिल्लीतील घटनांवर चर्चेसाठी तयार आहेत. त्यांनी सांगितले की, सरकार लोकसभेत ११ मार्चला तर राज्यसभेत १२ मार्च रोजी
चर्चेसाठी तयार अाहे. 

राज्यसभेतही गदारोळ

दिल्लीतील हिंसाचारावर होळीनंतर चर्चा करण्यास विरोध करत विरोधकांनी घातलेल्या गाेंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सभागृहात मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चर्चेसाठी एकमत झाले होते आणि सभापती व्यंकय्या नायडू यांच्या मंजुरीनंतर बुधवारी चर्चा होणार होती. मात्र, सभापतींनी त्यास मंजुरी दिली नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...