Home | Jeevan Mantra | Dharm | Rudraksha Increase Memory And Controls Blood Pressure

रूद्राक्षामुळे वाढते स्मरणशक्ती आणि रक्तदाब राहतो नियंत्रणात, धार्मिक महत्वाशिवाय रुद्राक्षाचे इतर आहेत अनेक फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 25, 2019, 05:13 PM IST

उपनिषदात रूद्राक्षाला 'शंकराचा तिसरा डोळा' म्हटले आहे

 • Rudraksha Increase Memory And Controls Blood Pressure

  जीवन मंत्र डेस्क - भारतीय संस्कृतीत रूद्राक्षाला अत्यंत महत्व आहे. असे मानले जाते की, रूद्राक्ष प्रत्येक प्रकारच्या हाणीकारक ऊर्जेपासून माणसाचे संरक्षण करते. याचा उपयोग फक्त तपस्वी नाही तर संसारिक जीवनातील लोक देखील करतात. तुम्ही देखील अनेक तपस्वींसोबत साधारण लोकांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ पाहिली असेल. रुद्राक्षाची माळा परिधान करणे धार्मिक महत्वानुसार वैज्ञानिकदृष्ट्या लाभदायक आहे. रूद्राक्ष माळा धारण केल्याने शरीरावर सकारात्मक प्रभाव पाहण्यात मिळतो.


  धार्मिक महत्व
  विद्येश्वर संहिता भगवान महादेवाशी संबंधित आहे. या संहितेमध्ये भगवान शंकराची पुजा, उपासना आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींचे सांगितले आहे. या ग्रंथात भस्मापासून ते रूद्राक्षा पर्यंतचे महत्व सांगण्यात आले आहे.
  रूद्राक्षाच्या उत्पत्तीबाबत ग्रंथात लिहिल आहे की,

  रुद्रस्य अक्षि रुद्राक्ष:, अक्ष्युपलक्षितम्अश्रु, तज्जन्य: वृक्ष:।


  म्हणजेच 'रुद्र'चा अर्थ शिव आणि 'अक्ष'चा अर्थ डोळा किंवा आत्मा आहे. त्रिपुरासुराला भस्म केल्यानंतर शंकराचे हृदय पिळवटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ज्याठिकाणी हे अश्रू पडले त्याठिकाणी 'रूद्राक्षा'चे झाड उगवले. हिंदू धर्मीय आणि विशेषतः शैव रूद्राक्षाला अत्यंत पवित्र मानतात. शैव तांत्रिक रूद्राक्षाची माळा धारण करतात आणि त्यापासून जप करतात. उपनिषदात रूद्राक्षाला 'शंकराचा तिसरा डोळा' म्हटले आहे. रूद्राक्ष धारण केल्याने दिवसभरात केलेले सर्व पाप नष्ट होते आणि कित्येक पटीने पुण्य मिळते. रूद्राक्षामध्ये हृदयासंबंधी विकारांना दूर करण्याची अद्भुत क्षमता आहे.


  बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी प्रभावी

  > वैज्ञानिकांनुसार रूद्राक्षात इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणांमुळे अद्भुत शक्ती असते. विद्युत चुंबकीय प्रभावामुळे यातील औषधी क्षमता निर्माण होते.

  > आंतरराष्ट्रीय विद्यापीठ फ्लोरिडाचे वैज्ञानिक डॉ.डेव्हिड ली यांनी संशोधनानंतर सांगितले की, रुद्राक्ष विद्युत ऊर्जेला संचित करून ठेवते. यामुळे चुंबकीय गुण विकसित होतात. हे मेंदूतील काही रसायनांना उत्तेजित करते. अशाप्रकारे शरीराचा चिकित्सकीय उपचार होतो. बहुतेक याच कारणामुळे रुद्राक्षाचा शरीराला स्पर्श होताच लोकांना चांगले वाटते.


  > रुद्राक्ष बौद्धिक क्षमता आणि स्मरण शक्ती उत्तम करण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले जाते. रूद्राक्ष धारण केल्यामुळे चिंता आणि तणावासंबधी अडचणींमध्ये कमतरता येते. उत्साह आणि ऊर्जेत वाढ होते. रक्त परिसंचरण आणि हृदयाची धडधड शरीराच्या चहुबाजूने एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. रूद्राक्ष हृदयरोग, रक्तदाब तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रण करण्यासाठी प्रभावशाली मानले जाते.

Trending