आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Rules To Be Framed For Granting Driving Licences To Persons With Disabilities Will Be Simplified In Motor Vehicles Bill 2019

दिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसेंस मिळण्याचा मार्ग होणार अधिक सोपा, कायद्यात करण्यात येणार बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - केंद्र सरकारने मोटर वाहन कायदा 2019 मध्ये बदल करून दिव्यांगासाठी सहज सोपे बनवणार आहे. यासाठी कायद्यामध्ये ड्रायव्हिंग लायसेंसची प्रक्रिया आणखी सोपी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी दिव्यांगांना कोणत्या आधारावर परवाना देण्यात येईल याबाबत कोणतेही स्केल निश्चित करण्यात आले नाही. दिव्यांगांमध्ये मानसिक रोगी, दृष्टिबाधित सह ठराविक ड्रायव्हिंग स्किलचे लोक सहभागी असतात. अशात सर्वांसाठी ड्रायव्हिंग लायसेंस देण्याबाबत वेगळे निकष असणे गरजेचे आहे. 


कोर्टाच्या आदेशाचे केले नाही पालन
नॅशनल प्लॅटफॉ्रम फॉर द राइट ऑफ द डिसएबल (NPRD)चे महासचिक मुरलीधरन विश्वनाथ यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वी कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींना ड्रायव्हिंग टेस्ट देण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सांगतिले होते. पण यानंतरही त्यांना ड्रायव्हिंग लायसेंस देण्यास नकार दिला होता. 


केंद्राच्या आदेशाची झाली नाही सुनावणी
2016 मध्ये केंद्र सरकारने राज्यातील ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला सल्ला दिला होता की, दिव्यांग उमेद्वार चाचणीत पास झाल्यानंतर त्यांना ड्रायव्हिंग लायसेंस देण्यात यावे. पण अद्यापही या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. 


आरटीओ आणि लायसेंस अथॉरिटीच्या माराव्या लागतात फेऱ्या 
सध्याच्या दिशानिर्देशानुसार दिव्यांग लोकांना ड्रायव्हिंग लायसेंससाठी लेखी आणि प्रॅक्टिकल चाचणी देणे अनिवार्य असते. सोबतच दिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसेंस प्राप्त करण्यासाठी आरटीओकडून व्हीकलच्या मॉडिफिकेशचे प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. यानंतरच दिव्यांग ड्रायव्हिंग लायसेंससाठी अर्ज करू शकतात.