आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनांचे गोळे vs टीकेचे बाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक ज्वराने राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. प्रमुख पक्षांचे नेते आता ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. या सभांतून आश्वासनांची खैरात होत आहे, तर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. त्यांतील ही निवडक आश्वासने आणि टीका...
 

अमित शहा : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करू
मराठवाड्यातील दुष्काळ हटवू. २१ टीएमसी पाण्याचा प्रश्न सोडवू, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पूर्ण करू, धनगर समाजाला एसटी प्रवर्ग सुविधांसाठी एक हजार कोटींची तरतूद करू, तुळजापूरच्या पर्यटनाला जागतिक पातळीवर नेऊ. (तुळजापूरच्या सभेमध्ये)
 

शरद पवार : लष्करी कारवायांचा राजकीय फायदा नको
शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला, शेतकरी आत्महत्या वाढल्या, लष्करी कारवायांचा राजकीय फायदा घेतला नाही, कारण नसताना ईडीची नोटीस आली, शिवाजी महाराज स्मारकाचे काय झाले ?, बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचे काय झाले?  (नागपूरच्या सभेत)
 

उद्धव ठाकरे : तालुकास्तरावर पीक विमा कार्यालय 
जिल्हा- तालुकास्तरावर पीक विमा कार्यालय राहील, एक रुपयात आरोग्य चाचणी देऊ, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, घरगुती विजेचे दर ३० टक्क्यांनी कमी करू, पीक विमा कंपन्यांच्या गैरकारभारावर नियंत्रण ठेवणार.शेतकऱ्यांना १० हजार रु. मदत देऊ.(जालना येथील सभेत)
 

राज ठाकरे : बँका बुडाल्या, बेरोजगारीत मोठी वाढ
शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झाले आहेत, न्यायालयातून निर्णय मिळत नाहीत, सर्व शहरांचा विचका झाला आहे.,बँका बुडताहेत, रस्ते खड्ड्यात गेले आहेत, पीएमसी बँकेच्या अधिकारपदावर भाजपची माणसे आहेत. (मुंबईच्या सभेत)
 

देवेंद्र फडणवीस : कांदा निर्यातबंदी रद्दसाठी प्रयत्न करू
कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी पुढाकार घेऊ यासाठी पंतप्रधानांना भेटणार, खान्देशासाठीची नार-पार योजना पूर्ण करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेततळी, विहिरी शेतकऱ्यांना देऊ.
(नाशिक जिल्ह्यातील सभांत)
 

बाळासाहेब थोरात : जनतेला विकास हवा, गाजर नको
कलम ३७०, काश्मीर, सर्जिकल स्ट्राइकवर न बोलता सत्ताधाऱ्यांनी, वाढती बेरोजगारी, शेतीमालाला किंमत नाही, बंद पडलेले कारखाने यावर बोलावे. आम्हाला विकास हवा आहे, गाजर नको. आयात उमेदवारांना मत देताना विचार करा.
(तामलवाडी, ता. तुळजापूरच्या सभेत )
 
 

बातम्या आणखी आहेत...