आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून अफवा पसरवल्या जात आहेत, इतरांना काळजी करण्याचे कारण नाही - नितीन गडकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून देशभरात गदारोळ सुरु आहे. यादरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या विधेयकाबाबत आपले मत मांडले आहे. या विधेयकाबाबत देशात विविध अफवा पसरवण्यात येत आहे. आम्ही कोणत्याही समुदायला लक्ष करत नसल्याचे नितीन गडकरी म्हणाले. इतर देशातील शीख, हिंदू, ख्रिश्चन, बौध्द, जैन समुदायाला देशात सामावून घेणे हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "हिंदु, शीख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन समाजातील लोकांना इतर कोणत्याही देशात स्थान न मिळाल्यास त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही किंवा आम्ही कोणालाही पाकिस्तानात जाण्यास सांगत नाही. काळजी करण्याची काहीच नाही. अफवा पसरवल्या जात आहेत."

 

बातम्या आणखी आहेत...