आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात वाघ घुसल्याच्या भीतीने सर्वत्र खळबळ उडाली, घटनास्थळी पोलिसांसह वन विभागालाही बोलावण्यात आले, मग समोर आले हे सत्य...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनूड़(पंजाब)- बनूडमध्ये बुधवारी एफसीआय गोदामच्या मागे रस्त्याच्या किनाऱ्यावर लोकांनी वाघाला बसलेले पाहीले. त्यानंतर काहींनी त्याचे फोटोज काढून सोशल मीडियावर टाकले. फोटो व्हायरल झाल्यानंतर घाबरलेल्या लोकांनी आपापल्या घराच्या दारे खिडक्या बंद करून घराच्या छतावरून वाघाला पाहू लागले. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वन विभागाच्या टीमलाही बोलावले. त्यावेळी त्या वाघाची काहीच हालचाल होत नव्हती, त्यामुळे जवळ जाऊन पाहील्यावर तो खोटा वाघ असल्याचे कळाले.


खरतर, बुधवारी दुपारी 2 वाजता कोणीतरी वाघाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. या फोटोमुळे परिसरात घबराट पसरली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लोकांना त्या वाघापासून लांब राहण्याचे आदेश दिले. पोलिसदेखील पोहचले आणि नव विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आले. लोक दुरून वाघाला पाहू लागले. त्यावेळी त्या वाघाची काहीच हालचाल होत नव्हती म्हणून लोकांना संशय आला. पण त्याच्या जवळ जाण्याची कोणाचीच हिम्मत होत नव्हती. त्यावेळी कोणतरी सांगितले की, हा वाघ रात्री एका टॅम्पोमधून पडला आहे आणि हा खोटा आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जवळ जाऊन पाहील्यावर तो खरच खोटा वाघ असल्याचे दिसले.

बातम्या आणखी आहेत...