आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या बसने घेतला पेट, चालक-वाहकासह २८ प्रवासी सुखरूप....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- जळगाव खांदेशवरुन येणाऱ्या एसटी बसने आज २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास स्थानिक मलकापूररोड वरील गणेश नगर जवळ अचानक पेट घेतला. ही घटना लक्षात येताच चालक व वाहकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना तत्काळ बसमधून खाली उतरवले. यात सुदैवाने एसटी बस चालक, वाहकासह २८ प्रवाशी बालबाल बचावले. विशेष म्हणजे एसटी महामंडळाच्या वतीने ११ ते २५ जानेवारी या दरम्यान सुरक्षितता मोहिम राबवण्यात येत आहे. 
चिखली आगाराची एम.एच. ४०/ वाय / ५३४५ या क्रमांकाची बस जळगाव खांदेशवरुन परतीच्या मार्गाने निघाली. यावेळी बसमध्ये चालक सुरेश परिहार व वाहक महेंद्र सदावर्ते यांच्यासह २८ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलडाणा शहरात प्रवेश करताच मलकापूर रोड वरील गणेश नगर जवळ धावत्या एसटी बस मधून धूर बाहेर निघत असल्याचे लक्षात येताच चालक परिहार यांनी तातडीने एसटी बस जागेवरच उभी करून प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच एसटी बसने चारही बाजूने पेट घेतला. दरम्यान घटनास्थळाच्या बाजूलाच असलेल्या एसटी महामंडळाच्या वर्क शॉपमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अग्नीशमन बंबाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती नगर पालिकेच्या अग्नीशमन पथकाला देण्यात आली. 


या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यँत या आगीत चाके सोडून एसटीच्या वरच्या भागाचा अक्षरशः सांगाडा झाला होता. या एसटी बसला आग कशामुळे लागली, याची माहिती जरी मिळाली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेत एसटी महामंडळाचे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे एसटी बस मधील प्रवाशांचे प्राण वाचले आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाच्या वतीने ११ ते २५ जानेवारी या दरम्यान सुरक्षितता मोहिम राबवण्यात येत आहे. याच दरम्यान ही घटना घडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 


एसटी महामंडळाचे तीन लाखांचे झाले नुकसान 
बुलडाणा येथे पेटलेली बस विझविताना अग्निशमन दलाचे कर्मचारी. 
बस मधील अग्नीशमन यंत्र ठरले कुचकामी 


अचानक लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक बसमध्ये अग्नीशमन यंत्र बसवण्यात आले आहेत. परंतु बहुतांश बसमधील हे यंत्र निकामी असते. त्यामुळे बसमध्ये बसवलेले यंत्र शोभेसाठी बसवण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...