Home | Sports | Other Sports | Rupa Hengandi wins gold medal in weight lifting competition

वेटलिफ्टिंग : रूपा हनगंडीला सुवर्णपदक; रचला नवा विक्रम 

दिव्य मराठी | Update - Jan 12, 2019, 09:24 AM IST

रूपा हनगंडीने स्नॅचमध्ये ८३ किलो वजन उचलताना पश्चिम बंगालच्या सुकर्णा आदक हिने नोंदवलेला ८१ किलो हा विक्रम मोडला.

  • Rupa Hengandi wins gold medal in weight lifting competition

    महाराष्ट्रातील सांगलीची रूपा हनगंडी हिने २१ वर्षांखालील महिलांच्या ५९ किलो गटात सोनेरी वेध घेतला. तिने स्नॅचमध्ये ८३ किलो वजन उचलताना पश्चिम बंगालच्या सुकर्णा आदक हिने नोंदवलेला ८१ किलो हा विक्रम मोडला. तिने क्लीन व जर्कमध्ये १०३ किलो असे एकूण १८६ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले.

    हरियाणाच्या मोहिनी चव्हाण हिने अनुक्रमे ८२ किलो व ९९ किलो असे एकूण १८१ किलो वजन उचलून रुपेरी कामगिरी केली. आदकला येथे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने स्नॅचमध्ये ८१ किलो तसेच क्लीन व जर्कमध्ये ९६ किलो असे एकूण १७७ किलो वजन उचलले. १७ वर्षांखालील मुलींच्या ५९ किलो गटात आसामच्या दितिमोनी सोनोवाल हिला सुवर्णपदक मिळाले. स्नॅचमध्ये ६७ किलो तसेच क्लीन व जर्कमध्ये ८४ किलो असे एकूण १५१ किलो वजन उचलले. तामिळनाडूची वाय. पूर्णाश्री हिने १४६ किलो वजन उचलीत रौप्यपदक मिळवले तर तेलंगणाच्या व्ही.साहिथी हिला ब्राँझपदक मिळाले. तसेच महाराष्ट्राच्या मुलींना बॅडमिंटनमध्ये निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. २१ वर्षांखालील गटात पूर्वा बर्वे या स्थानिक खेळाडूला उत्तराखंडची खेळाडू उन्नती बिश्त हिने २१-१५, १७-२१, २१-१७ असे पराभूत केले. पूर्वा हिला येथे चौथे मानांकन देण्यात आले होते.

Trending