आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौपाळ्यात आजोयित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकरांची भाजपवर टीका  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

निलेश पाटील

नंदुरबार- विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. जनता आमच्या सोबत आहे असे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.पक्ष सोडणाऱ्याची कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. पुन्हा नव्या उमेदीने सक्रीय व्हावे, असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी 'पुन्हा येणार,पुन्हा येणार' म्हणणाऱ्यांना जनतेने घरी पाठवल्याची टीका केली.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व शेतकऱ्यांचा समस्या ऐकण्यासाठी प्रदेशाध्यक्षा चाकणकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता चौपाळे ता.नंदूरबार येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या,भाजप सरकारचा पाच वर्षांचा काळात नौकर भरती बंद करण्यात आल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले.परदेशी कंपन्यांचे कर्ज माफ करण्यात आले.परंतु,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. आजही 74 हजार बीएसएनएल कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अमोल भारती यांनी केले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी,तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी याप्रसंगी प्रदेश सचिव सुवर्णा बागल, नीता गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महादू गावित,जि.प सदस्य विश्‍वनाथ वळवी,उपसरपंच सारिका तांबोळी, विठ्ठल पटेल, सुरेंद्र कुवर,छायाबाई पटेल,ज्ञानेश्वर ठाकरे,प्रकाश मगरे, योगेश पाटील,दिनेश पाटील व परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होत्या.जिल्ह्यात लवकरच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या


संकटाच्या काळात ज्यांनी पक्षाला साथ न देता सोडून गेलेल्यांची चिंता करायची नाही.कार्यकर्त्यांनी पुन्हा सक्रिय होतं पक्षाच्या कामांना सुरुवात करावी. लवकरच जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.मेळाव्यात अनेक महिलांनी समस्या मांडल्या.जि.प निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवा 


जनतेने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. आता कार्यकर्त्यांनी सक्रिय होत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून द्या असे सांगितले.जिल्ह्यात झेडपी निवडणुका स्वतंत्र लढवणार आहात की आघाडी करून ?पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी बगल देत उत्तर देणे टाळले.

व्हाट्सअप तलाठ्याला निलंबित करा


साक्री तालुक्यातील बळसाने येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात न जाता 'पंचनामा'असा व्हाट्सअप ग्रुप तयार केल्याचा धक्कादायक प्रकार प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी उजेडात आणला होता. त्याविषयी त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून, संबंधित तलाठ्याचे निलंबित व्हावे अशी मागणी त्यांनी महिला मेळाव्याच्या माध्यमातून केली.

बातम्या आणखी आहेत...