गुजरात : 16 / गुजरात : 16 कोटी रुपयांच्या 4 लाख किलो तुपाने करण्यात आला देवीचा अभिषेक

Oct 21,2018 12:26:00 PM IST

गांधीनगर - गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील रूपाल गावामध्ये शुक्रवारी पल्ली महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये वरदायिनी देवीच्या पल्ली स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी पाच लाखापेक्षा जास्त भक्त आले होते. चार तास चाललेल्या या उत्सवात चार लाख किलो तुपाने देवीच्या पल्ली स्वरूपाचा अभिषेक करण्यात आला. या तुपाची अंदाजे किंमत 16 कोटी रुपये सांगितली जात आहे.


मान्यतेनुसार, रूपाल गावामध्ये देवीचा तुपाने अभिषेक करण्याची प्रथा महाभारत काळापासून चालत आलेली आहे. इच्छापूर्ती झाल्यानंतर भक्त तुपाने अभिषेक करतात. येथे उत्सव सुरु होण्याच्या 12 तासांपूर्वीपासून भक्त येण्यास सुरुवात होते.


पांडवांनीही केले होता अभिषेक - मान्यतेनुसार महाभारत युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर पांडव वरदायिनी देवीच्या दर्शनासाठी आले होते. सोन्याची पल्ली तयार करून चारही दिशांना शोभायात्रा काढून पंच बलियज्ञ केला होता. तेव्हापासून ही प्रथा चालू आहे.

X