आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rupani Government Again Proved Insensitive, Failing To Take Action Against The Frequent Fire Incident In Tuition Classes

रूपाणी सरकारच्या हलगरजीपणामुळे 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद(गुजरात)- येथील ट्यूशन क्लाससमध्ये शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पण ट्यूशन क्लासमध्ये आग लागण्याची मागील सहा महिण्यात ही तिसरी घटना आहे. या अपघातानंतर गुजरात सरकार किंवा महानगरपालिका अग्निशामक सुरक्षेचा तपास करण्यात संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे लोकांनी आपला आक्रोश व्यक्त करताना रुपाणी सरकारविरोधात नारेबाजी केली.


नोव्हेंबर 2018मध्ये वेसूमध्ये घडली होती घटना
सुरतच्या वेसुमध्ये नोव्हेंबर 2018 मध्ये एका ट्यूशन क्लाससमध्ये आग लागल्यानंतर पालकांनी गुजरातमधील सर्व ट्यूशन क्लासेसची अग्निशामक सुरक्षेची तपासणी आणि वाढत्या कोचिंग क्लासेसविरूद्ध कठोर करवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शासनाने याची तपासणी करण्याचे नाटक केले आणि नंतर सर्व प्रकरण फक्त कागदोपत्री जमा झाले. शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे रूपाणी सरकारचा हलगरचीपणा समोर आला आहे.


मागील घटनेकडे शासनाचे दुर्लक्ष
गुजरातचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या हलगरजीपणामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा-पुन्हा घडत आहेत. नोव्हेंबरमध्ये सुरत व्यतिरिक्त अहमदाबादमध्येही आग लागली होती. पण रूपाणी सरकारने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा अशी घटना घडली आणि यात 23 मुलांचा बळी गेला. या सर्व घटनेमुळे येथील सर्व पालकांनी आता मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.