आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलरच्या तुलनेत रुपया 110 पैशांनी घसरला; पेट्रोल-डिझेलसह मोबाइल, लॅपटॉप स्वस्त होण्याची शक्यता घटली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सोमवारी भारतीय रुपया १.०८ रुपयांच्या (१.६० टक्के) घसरणीसह ६९.९३ वर बंद झाला. ही रुपयाची नीचांकी पातळी आहे. मागील पाच वर्षांत एका दिवसात रुपयामध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. याआधी रुपया ऑगस्ट २०१३ मध्ये एकाच दिवसात १४८ पैसे (२.४ टक्के) घसरला होता. शुक्रवारी रूपया एक डॉलरच्या तुलनेत १५ पैसे घसरणीसह ६८.८३ या पातळीवर बंद झाला होता.  

 

काय होतील परिणाम
भारतीय चलनात झालेल्या या घसरणीमुळे डॉलरची खरेदी करण्यासाठी आता जास्त पैसे द्यावे लागतील. यामुळे देशात आयात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमती वाढतील, तर निर्यात होणाऱ्या वस्तू आणि सेवेसाठी जास्त पैसे मिळतील. भारतात पेट्रोल-डिझेल तयार करण्यासाठी सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात केली जाते. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उदा. मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉप आदींची जास्त आयात होते. तिसऱ्या क्रमांकावर सोने जास्त आयात केले जाते. विदेशातील शिक्षण आणि विदेशात फिरायला जाणेही महाग होईल. म्हणजेच रुपयातील घसरणीमुळे आता पेट्रोल-डिझेलसह विदेशी मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप आणि सोने यांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा घटली आहे.  

 

निर्यातकांसाठी फायदा  
विदेशातून डॉलरमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेमेंटला भारतीय बाजारात रुपयात बदलल्यानंतर आता जास्त रुपये मिळतील. म्हणजेच निर्यात होणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि सेवेच्या बदल्यात जो मोबदला येईल, त्यावर जास्त फायदा होईल. भारतातून आयटी सेवांबरोबरच अभियांत्रिकी वस्तू, जेम्स अँड ज्वेलरी, पेट्रोलियम उत्पादने आणि अनेक प्रकारच्या कृषी आधारित उत्पादनांची निर्यात होते. रुपयात झालेल्या घसरणीचा या सर्व निर्यातीला फायदा मिळण्याची शक्यता आहे.  

 

भारतीय चलनाची पाच नीचांकी पातळी  
> दिनांक- एका डॉलरची किंमत  
१३ ऑगस्ट २०१८ - ६९.९१  
२० जुलै २०१८ - ६९.१२  
२८ जून २०१८ - ६९.१०  
२४ नोव्हेंबर २०१६ - ६८.८६  
२८ ऑगस्ट २०१३ - ६८.८०

 

बातम्या आणखी आहेत...