Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Rural Development Minister Pankaja Munde's two-day nagar tour

'काकां'च्या आरोपाला 'ताई' देणार उत्तर; ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा दोन दिवस नगर दौरा

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 12:20 PM IST

स्व. गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळी निकटवर्तीय असलेले व सध्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेले प्रताप ढाकणे यांनी ऊसतोड

  • Rural Development Minister Pankaja Munde's two-day nagar tour

    नगर- स्व. गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळी निकटवर्तीय असलेले व सध्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेले प्रताप ढाकणे यांनी ऊसतोड मजुरांची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला शुक्रवारी नगरमध्ये येणाऱ्या ग्रामविकासमंत्री मुंडे प्रत्युत्तर देणार आहेत.


    प्रताप ढाकणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर तोफ डागली होती. मुंडे या समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ढाकणे यांनी केलेल्या आरोपामुळे संतप्त झालेल्या मुंडे समर्थकांनी पाथर्डीत ढाकणे यांच्या पुतळ्याचे दहन केले. या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शुक्रवारी (७ सप्टेंबर) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवारी सकाळी त्या विमानाने शिर्डीत दाखल होणार आहेत. शिर्डीत दर्शन आटोपून त्या शिर्डीहून शनिशिंगणापूरला रवाना होणार आहेत. शनिशिंगणापूरहून मोटारीने पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ येथे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्या जातील. ढोरजळगाव (ता. शेवगाव) येथे त्या जाणार आहेत. रात्री त्या नगरला येणार आहेत. रात्री नगरमध्ये मुक्काम करुन शनिवारी (८ सप्टेंबर) त्या चोंडी (ता. जामखेड) येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. त्यानंतर निघोज (ता. पारनेर) व दुपारनंतर त्या मुंबईकडे रवाना होणार आहेत. या दोन दिवसांच्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात मंुडे या ढाकणे यांच्या आरोपांवर काय बोलणार ? याकडे मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.


    दरम्यान, भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री वीस दिवसांच्या दौऱ्यासाठी परदेशी गेले आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्याचा प्रश्न फारसा उद््भवणार नसल्यामुळे शास्त्रींनी आपली व्याख्यानांसाठी ही वेळ निवडली आहे. तथापि, वंजारी आरक्षणाच्या मुद्यावर भगवानगडाचा पाठिंबा फुलचंद कराड यांना अपेक्षित असला, तरी त्याबाबत मात्र कोणतेही स्पष्टीकरण देण्याचे त्यांनी टाळले आहे.


    उद्या पंकजा मुंडे आपल्या दौऱ्यात पाथर्डीलाही भेट देणार आहेत. यावेळी त्या महंतांच्या भूमिकेवर काय भाष्य करतात, याचीही उत्सुकताही कार्यकर्त्यांना आहे.

Trending