आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये ‘महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. ‘ग्रामीण भारतातील उद्योग’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा “महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’ साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद््घाटन राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी  होणार आहे.  


प्रगती मैदान येथे  दि. १४ ते २७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनच्या वतीने ३८ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या वतीने “महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’ हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडवणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.


राज्यातील ग्रामीण उद्योजकांचे १३ आणि महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचा एक असे एकूण १४ स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. ग्रामीण उद्योगाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघु उद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी  विषयांना स्पर्श करणारे आकर्षक 
महाराष्ट्र दालन असेल.

बातम्या आणखी आहेत...