आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसचं एककेंद्री राजकारण !

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसचा प्रत्येक सीझन काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. पण सध्या सुरू असलेल्या सीझनमध्ये जे नावीन्य आहे ते म्हणजे स्पर्धकांची हिंसकता आणि स्वतःच्या नियमांचे स्वतः बिग बॉसकडूनच केले गेलेले उल्लंघन! चॅनलचा बिग बॉसच्या निर्मात्यांवर दबाव आणि त्यामुळे थेट शोच्या संकल्पनेचीच केलेली मोडतोड हे बिग बॉस सीझन १३ चं प्रमुख वैशिष्ट्य आहे. बिग बॉसचा सध्या सुरू असलेला तेरावा सीझन विविध गोष्टींनी मनोरंजक बनलेला आहे. बिग बॉसचा प्रत्येक सीझन काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. पण या सीझनमध्ये जे नावीन्य आहे ते म्हणजे स्पर्धकांची हिंसकता आणि स्वतःच्या नियमांचे स्वतः बिग बॉसकडूनच केले गेलेले उल्लंघन! चॅनलचा बिग बॉसच्या निर्मात्यांवर दबाव आणि त्यामुळे थेट शोच्या संकल्पनेचीच केलेली मोडतोड हे बिग बॉस सीझन १३ चं प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे प्रत्येक सीझनमध्ये थोडंफार झालेलं आहे, परंतु कोणत्याही कारणाशिवाय हे घडण्याची ही बिग बॉसच्या परंपरेतील पहिलीच वेळ असेल! बिग बॉस सीझन ११ ची स्पर्धक हीना खान मागे म्हणाली होती की, "Big boss is Well edited show'. बिग बॉस हा रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड नसून फक्त उत्तम संपादन केलेला शो आहे, ज्यामध्ये एखाद्या संवादाचा प्रसंग अर्धाच दाखवून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली जाते आणि द्वयअर्थाच्या शक्यता प्रेक्षकांच्या मनात निर्माण केल्या जातात. या वर्षीही तसं घडतंय, पण गेल्या वर्षीच्या सीझन १२ पासून स्वतःच्या चॅनलच्या कलाकार मंडळी असणाऱ्या स्पर्धकांना जिंकवण्याकडे, त्यांच्या चुकांकडे पांघरूण घालण्याकडे कलर्स चॅनल आणि प्रोग्रॅम हेडचा कल दिसत आहे. अतिशय दबक्या आवाजात रडत पडत मॅचफिक्सिंगमध्ये दोषी ठरलेला क्रिकेटपटू श्रीसंतच्या चुकांनाही बरोबर म्हणणारी कलर्सच्या "ससुराल सिमरन का' मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या सीझनची विजेती होती. या वर्षी आरती सिंग, सिद्धार्थ शुक्ला,रश्मी देसाई हे कलर्स वाहिनीचे चेहरे शोमध्ये आहेत. सध्याच्या सीझनमध्ये तब्येत खणखणीत असतानाच देवोलिना अचानक आजारी पडली आणि तिचा प्रॉक्सी म्हणून बिग बॉस सीझन ११ चा मास्टरमाइंड स्पर्धक विकास गुप्ताला बोलावले गेले.परंतु सिद्धार्थ शुक्ला आणि पारसला दुखापत झालेली असताना मात्र प्रॉक्सी म्हणून कुणालाही ठेवले नाही. या वर्षी कलर्सच्या चेहऱ्यांना त्यांच्या चुकांसाठी हवी तशी शिक्षा मिळाली नाही. बिग बॉसमधील स्पर्धकांचे आतापर्यंत ८८ दिवस झालेत व आतापर्यंत सिद्धार्थ शुक्लाचा एकट्याचा गेम झालाय. त्यात त्याच्याशिवाय सर्वांना शिक्षा दिल्या जातात. रश्मी देसाईच्या वादानंतरही सर्व सेलिब्रिटींकडून व बिग बॉसच्या चाहत्यांकडून सिद्धार्थला समर्थन मिळणं हे पुरुषसत्ताक समाजाचं लक्षण असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉसचे स्पर्धक युक्त्या आणि धोरणं पाहण्यापेक्षा खोटा वाद आणि स्त्रियांचं शाब्दिक चारित्र्यहनन पाहू इच्छितात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. या कारणांमुळेच कदाचित सलमान खाननेही शोला अनेकदा "वीकेंड का वॉर'मध्ये शिव्या घातल्या आहेत. शो हिट झाल्यामुळे हा शो पाच आठवड्यांनी आणखी वाढवला गेलाय. आता तो फेब्रुवारीपर्यंत पाहायला मिळणार आहे. पण दर दोन दिवसाला एक भांडणं आणि आसिम,रश्मी व इतर स्पर्धकांवर होणारा अन्याय तसेच सिद्धार्थ शुक्लाची दादागिरी यामुळे तो प्रेक्षकांच्या रसिकबुद्धीला रुचेल आणि सातत्याने सुरू राहील हे मात्र निश्चित आहे. देवोलिना,रश्मी,अरहान,शेफाली बग्गा यांना परत बोलावणे,डबल एविक्शन कधी करणे तर कधी न करणे,आखाडा न खोलणे, टास्क रद्द झाल्यास निभावून नेणे,शारीरिक भांडणे झाली तरी घरात ठेवणे असे अनेक गैरप्रकार स्वतः बिग बॉसने सुरू ठेवले आहेत. त्यामुळे आता या शोला प्रेक्षकांकडूनच शिव्या घालायला सुरुवात झाली आहे. वारंवार बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींना प्रवेश दिला जात असून कलर्सवरील विविध मालिकांचं प्रमोशन केलं जातंय. "दबंग ३' चंसुद्धा नुकतेच जोरात प्रमोशन झालं आहे.त्यामुळे शोमधला स्पर्धकांचा खेळाडूपणा जाऊन शोला फक्त जाहिराती आणि खोट्या भांडणांचं कृत्रिम स्वरूप आलंय. आसिम आणि पारसच्या अगदी खालच्या पातळीवरच्या भांडणानंतर अलीकडे सिद्धार्थ शुक्ला व रश्मीचे कडाक्याचे भांडण झाले आहे. या भांडणांतून फक्त प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसादच नाही तर  काही विशिष्ट "इझम'चं समर्थन करण्याचा अवाजवी प्रयत्नही केला गेलाय. अरहान आणि रश्मीच्या घरगुती वादानंतर लगेच सिद्धार्थ आणि रश्मीचे भांडण होणे आणि त्यात आसिमला सहज शिव्या खाव्या लागणे यामधून ही प्रकरणे आतापर्यंत कोणत्याही सीझनच्या तुलनेत उग्र ठरली आहेत. याला फक्त शोचे मेकर्सच नव्हे तर प्रेक्षकही सारख्याच प्रमाणात जबाबदार आहेत. बिग बॉसचा बारावा सीझन अपयशी ठरला होता. तरीही तो सीझन या सीझनच्या तुलनेत काही अंशी बरा वाटतो. इथे सिद्धार्थ शुक्ला तर अगोदरच्या सीझनमध्ये श्रीसंत होता.आधीच्या  सीझनमध्ये सेलिब्रिटीसोबत कॉमन लोकांनाही संधी दिली होती.त्यामुळे बऱ्याचदा सेलिब्रिटी स्टेटस आणि इगोचे जे प्रश्न उद्भवतात ते त्या सीझनमध्ये उद्भवले नव्हते. अगदी आपण ज्या स्पर्धकांना बघत आहोत ते आपल्याच समाजाचे भाग आहेत का इतपत टोकाचे प्रश्न सध्याचा बिग बॉसचा सीझन बघताना प्रेक्षकांना पडत आहेत.त्यामुळे सोशल मीडियावरही यासंदर्भात अनेक मीम्स यातून बघायला मिळत आहेत. शोमध्ये आपलं योगदान व्यवस्थित देऊन विकास गुप्ताने तर आपली जबाबदारी चोख पार पाडली, पण इतरांचं काय? सिद्धार्थ शुक्ला आणि पारसच्या अश्लील बोलण्याला म्यूट करून त्यांना बोलण्याबद्दल कोणतीही सूचना बिग बॉसने केली नाही. घरात इंग्रजी न बोलण्याचा नियमही सर्रासपणे बिग बॉसच्या स्पर्धकांकडून मोडला मारला जात आहे. दोनपेक्षा अधिक टास्क अरेरावीने सिद्धार्थच्या टीमने रद्द केले आहेत. काहींमध्ये तर मारामारीसुद्धा झालेली आहे. शहनाजच्या खोटेपणाला क्यूटपणाच्या आवरणाने तर पारस व माहिराच्या दुटप्पीपणाला युक्तिवादाच्या आवरणाने झाकलं गेलं.तरीही बऱ्याच गोष्टी वर डोकावत होत्या, ज्यातून सगळं स्पष्ट दिसत आहे. या वेळेस अजून एक नवी गोष्ट समाविष्ट झाली ती म्हणजे सर्व स्पर्धकांचं इतरांबद्दलचं मत घरातून बेदखल करण्याच्या प्रक्रियेचा भाग असणे. यात स्पर्धक आपल्या निर्णयशक्तीचा वापर करण्याऐवजी गटबाजीचा आणि वैयक्तिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करतील याचा कसलाच विचार बिग बॉसने केलेला नाही. सिद्धार्थला प्रेक्षकांत प्रसिद्ध केल्यावरच त्याला त्याच्या चुकीसाठी दोन आठवड्यांसाठी नॉमिनेट केले गेले. या प्रकारची पडद्यामागे राहून चलाखी करण्याचं इत्थंभूत कार्य बिग बॉसने पार पाडलं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस चाहते हैं' ऐवजी ‘बिग बॉस आदेश देते है कि' म्हणणं त्यांच्या वास्तव भूमिकेला जास्त संयुक्तिक ठरेल ! बिग बॉसचा एकंदरीत हा सीझन बघाल तर जागोजागी विरोधाभास दिसतील. बाहेरच्या दुनियेत सभ्य म्हणून ओळख असणाऱ्या अनेक स्पर्धकांच्या सभ्यतेचा बुरखा इथे येऊन फाटलाय. यात दोष बिग बॉसच्या दुटप्पीपणाचा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणे या विसरलेल्या जबाबदारीचाही आहे.चांगल्या स्पर्धकांबद्दल कठोर कारवाई करून थेट शोला धमक्या देणाऱ्यांचीच बाजू घेण्याचे काम बिग बॉसने केले आहे.आता येणाऱ्या फेब्रुवारीतच आपल्याला बिग बॉसचा विजेता बघायला मिळेल. पण त्यासाठी प्रेक्षकांची शोसंबंधीची जागरूकता आणि जबाबदारीही महत्त्वाची आहेच !

ऋषिकेश तेलंगे

rushikeshtelange1999@gmail.com

लेखकाचा संपर्क - 8329396503