Home | International | Other Country | Russia awarded prime minister Nnarendra Modi with Saint Andrew Award

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘सेंट अँड्रयू अवॉर्ड’ जाहीर, हा सन्मान मिळवणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 07:33 PM IST

संयुक्त राष्ट्राकडूनही 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार

 • Russia awarded prime minister Nnarendra Modi with Saint Andrew Award

  मॉस्को- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील आणखी एका पुरस्काराने गौरवले जाणार आहे. रशियाने पंतप्रधान मोदींना आपला ‘सेंट अँड्रयू अवॉर्ड’ सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे जाहीर केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही या प्रस्तावावर सही केली आहे. नुकतेच संयुक्त अरब अमिरातीनेही(यूएई) मोदींना जायद पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.

  रशियन दुतावासाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. 12 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा करण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर घेऊन गेल्याबद्दल पुरस्कार देण्यात आलाय. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील. यापूर्वी हा पुरस्कार चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना देण्यात आला होता.

  यूएईकडूनही मोदींचा सन्मान
  नुकतेच यूएईनेही पंतप्रधान मोदींना 'जायद' पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. भारत आणि यूएई या दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर घेऊन गेल्याबद्दल यूएईकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना या पुरस्काराचे स्वागत करत यूएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन यांचे आभारही मानले होते.

  दक्षिण कोरियाकडूनही मोदींना पुरस्कार
  या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाने 'सियोल शांती' पुरस्काराने सन्मानित केले होते. हा पुरस्कार मिळवणारे मोदी पहिलेच भारतीय व्यक्ती ठरले. मोदी हे एक 'वर्ल्ड लीडर' म्हणून पुढे आले आहेत, त्यासोबतच त्यांनी दक्षिण कोरिया आणि भारताचे संबंध आणखी मजबूत केले आहेत, असे दक्षिण कोरियाने म्हटले होते. शिवाय मोदींना संयुक्त राष्ट्राकडूनही 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार देण्यात आला होता.

Trending