आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russia Banned For Four Years By WADA After Tampered With Laboratory Data Linked To Positive Doping Tests

डोपिंगप्रकरणी रशियावर 4 वर्षांची बंदी, ऑलंपिक आणि फुटबॉल वर्ल्डकप खेळता येणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जे एथलीट डोपिंगमध्ये दोषी आढळले नाही, ते न्यूट्रल खेळाडू म्हणून खेळात भाग घेऊ शकतील

स्पोर्ट डेस्क- वर्ल्ड अँटी डोपिंग एजंसी (वाडा)ने आज(सोमवार) रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे. रशिया आता 2020 मध्ये जापानमध्ये होत असलेल्या ऑलंपिक आणि 2022 मध्ये कतरमध्ये होत असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भाग घेऊ शकणार नाही. तसेच तो विंटर ऑलंपिक आणि पॅरालंपिकमध्येही सहभाग घेऊ शकणार नाही. वाडाने सांगितले की, रशियावर आरोप होते की, ते डोप टेस्टसाठी आपल्या एथलीट्सचे चुकीचे सँपल्स पाठवत आहेत. तपासात हे सिद्ध झाले की, रशियाने सँपल्समध्ये छेडछाड केली आहे.स्विट्जरलँडमध्ये वाडाच्या 12 सदस्यीय कार्यकारी समीतीने रशियाविरुद्ध बंदी घातल्याचे सांगितले. रशियातील अँटी डोपिंग एजंसीचे प्रमुख यूरी गानसने ही बंदी घातल्याची माहिती दिली. वाडाच्या नियमांनुसार, रशियातील जे एथलीट डोपिंगमध्ये दोषी आढळले नाहीत, ते न्यूट्रल खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होऊ शकतेत.

बातम्या आणखी आहेत...