आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russia Claims New Avangard Hypersonic Missile Deployed In Military Can Travel 27 Times The Speed Of Sound

जगातील पहिले हायपरसॉनिक मिसाइल रशियन लष्करात सामिल; ताशी 33,000 किमी, आवाजापेक्षा 27 पट वेगवान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियाने आवाजापेक्षा 27 पट वेगवान असे अवनगार्ड हायपरसॉनिक मिसाइल आपल्या लष्करात समाविष्ट केले आहे. एखाद्या देशाच्या लष्करात सामिल होणारे हे जगातील पहिलेच हायपरसॉनिक मिलाइल आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यासंदर्भातील घोषणा करताना हे मिसाइल अण्वस्त्रवाहक असल्याचे सांगितले. हे मिसाइल आवाजाच्या गतीपेक्षा किमान 20 पट अधिक वेगाने मारा करण्यास सक्षम आहे. पुतिन यांनी सांगितल्याप्रमाणे, हे मिसाइल इतके वेगवान आहे की कुठल्याही रडारमध्ये पकडले जाणार नाही किंवा कुठलीही क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा याला थांबवू शकणार नाही. रशियाचे संरक्षण मंत्री सेर्जी शोइगू म्हणाले, की 27 डिसेंबर 2019 रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता हे मिसाइल लष्करात सामिल करण्यात आले. हे मिसाइल नेमके कुठे तैनात केले जाणार याची माहिती गुप्त ठेवली जाईल. तरीही अवनगार्ड क्षेपणास्त्र यूरलच्या डोंगराळ भागात तैनात केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

हायपरसॉनिक मिसाइल म्हणजे नेमके काय?

हायपरसॉनिक मिसाइल आवाजाच्या (ताशी 1235 किमी) किमान 5 पट अधिक वेगवान असते. अर्थात याची किमान स्पीड सुद्धा ताशी 6174 पेक्षा कमी नसते. हायपरसॉनिक मिसाइल क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाइल असे दोन्ही फीचर्स असलेली आहे. रशियाचे हयपरसॉनिक मिसाइल अण्वस्त्रवाहक आहे. ठरवलेल्या लक्ष्यावर अचूक मारा करण्यासाठी हे मिसाइल आधी अंतराळात जातात आणि तेथून ठरवलेल्या लक्ष्यावर मारा करतात. यातून हवेत आणि जमीनीवर सुद्धा मारा केला जाऊ शकतो. अशा स्वरुपाचे क्षेपणास्त्र थांबवणे किंवा नष्ट करणे अतिशय कठिण मानले जाते. सोबतच, स्पीड अफाट असल्याने ते कुठल्याही रडारमध्ये येत नाहीत.

अमेरिका आणि चीनकडे सुद्धा नाहीत हायपसॉनिक मिसाइल

रशियाने डिझाईन केलेले अवनगार्ड हायपरसॉनिक मिसाइल हे आवाजाच्या वेगापेक्षा 24 पट अधिक वेगवान आहेत. यातून ताशी 33 हजार किमी स्पीडने शत्रूच्या ठिकाणाला बेचिराख केले जाऊ शकते. आपल्या प्रकारचे हे जगातील पहिलेच हायपरसॉनिक क्षेपणास्त्र असल्याचा दावा रशियाने केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, अमेरिकेत सध्या हायपरसॉनिक मिसाइलचे काम सुरू आहे. तर चीनमध्ये या मिसाइलच्या 2014 मध्ये चाचण्या घेण्यात आल्या आहेत.