आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रिय टी.व्ही, शो 'गेम ऑफ थ्रोन्स' च्या शेवटच भाग प्रसारीत होण्याआधीच आयर्न थ्रोन जप्त, सांगितले- चुकीच्या पद्धतीने लावले होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलीवूड डेस्क- अमेरिकेची लोकप्रिय टीव्ही सीरिज "गेम ऑफ थ्रोन्स" चा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. पण त्याआधीच सीरिजमधल्या सिंहासनाला रशियाने जप्त केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिहासंन चुकीच्या पद्धतीने लावले होते. सिंहासन जप्त केल्यानंतर ते गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे. अजून हे स्पष्ट झाले नाहीये की, हे सिंहासन शोच्या प्रोड्यूसर्सना परत दिले जाईल का नाही. 

 

प्रोड्यूसर म्हणाले-सिंहासन जप्त झाले तरी, शोच्या प्रसारणाला कोणताही फरक पडणार नाही. शोची शुटींग आधीच पूर्ण झाली आहे. हे सिंहासन सेंट पीटर्सबर्ग शहरातील मुख्य चौकत लावण्यात आले होते. येथे पर्यटक सिंहासनासोबत फोटो काढत होते. सेंट पीटर्सबर्ग राजेशाही असताना राजधानी होती. 


लोकप्रिय आहे 'गेम ऑफ थ्रोन्स'
आतापर्यंत या शोचे 72 एपीसोड प्रसारित झाले आहेत. पहिला एपीसोड 17 एप्रिल 2011 मध्ये आला होता. सामाजिक विषयांवर रिसर्च करणारी कंपनी वीटीएसआयओएमच्या सर्वेनुसार दर 10 रशियन नागरिकांपैकी एक नागरिक हा शो पाहत आहे. 


डोनाल्ड ट्रम्पदेखील 'गेम ऑफ थ्रोन्स'चे फॅन आहेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील 'गेम ऑफ थ्रोन्सट वेब सीरिजचे फॅन आहेत. अमरिकेतील निवडणुकांच्यावेळी रशियाने दखल दिल्याप्रकरण रॉबर्ट मुलर समितीकडून मिळालेल्या क्लीनचिटनंतर ट्रम्प इतके उत्साहित झाले होते की, त्यांनी 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या पोस्टरच्या स्टाइलमध्ये आपला फोटो ट्वीट केला होता आणि त्यासोबत लिहीले होते, 'गेम ओव्हर'.

बातम्या आणखी आहेत...