आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russia Set Up An Independent Internet System, Saying US Interferes, Other Countries Criticises

अमेरिकी हस्तक्षेपाचा धोका असल्याचे म्हणत रशियाने उभारली स्वतंत्र इंटरनेट यंत्रणा, इतर देशांकडून टीका

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

रशिया : रशियाने आपल्याच देशात पर्यायी इंटरनेट यंत्रणा उभारली असून त्याची चाचणी यशस्वी ठरली. सोमवारी याची माहिती मिळताच नागरिक चक्रावून गेले. तथापि, त्यांनी आपल्या राेजच्या दैनंदिन इंटरनेट वापरात या बदलाचा पत्ताही लागला नाही. वर्ल्ड वाइड वेबशी संपर्क तुटला किंवा अमेरिकी हस्तक्षेप वाढला तर नागरिकांना जोडण्यासाठी आपली पर्यायी इंटरनेट यंत्रणा सज्ज असावी म्हणून रशिया गेल्या तीन वर्षांपासून याची तयारी करत होता. रशियाच्या या कारनाम्यावर टीका करत अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी म्हटले आहे की, यामुळे इंटरनेट ब्रेकअप होईल. रशिया आपल्याच लोकांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू पाहत आहे. याआधी चीन आणि इराणनेही असा प्रयत्न केलेला आहे. रशियाचे मंत्री अॅलेक्सी सोकोलोव्ह म्हणाले, हा प्रयोग सार्वभौम इंटरनेट विधेयकाअंतर्गत केला. अमेरिकी सायबर सुरक्षेच्या आक्रमक धोरणामुळे आम्ही बाध्य झालो. सरकारी संस्था, टेलिकॉम ऑपरेटर्स, मेसेंजर्स व इमेल सेवा प्रदात्यांना प्रयोगात सहभागी करून घेतले.

जगभरातील इंटरनेटवर कुणाचीही मालकी नाही

इंटरनेटवर एखाद्या सरकारचे नियंत्रण नाही. यावर कुणाची मालकी नाही. काही संस्था सल्ला, निकष या आधारे माहिती देऊन यात मदत करतात. जगभरात सुमारे साडेचारशे कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात.

इंटरनेट असे काम करते

डोमेन इंटरनेटवर दिलेले नाव, आयपी अॅड्रेस स्टोअर करतो. डोमेनचा संदर्भ येताच सर्व्हर हा डेटा संबंधित आयपी अॅड्रेसवर पाठवतो.

वर्ल्ड वाइड कन्सोर्टियम

इंटरनेटमध्ये गाइडलाइन, स्टँडर्ड व रिसर्च करणाऱ्या समूहांना वर्ल्डवाइड कन्सोर्टियम (W3C) म्हणतात.

त्रिस्तरीय सेवा पुरवठा

सेवा पुरवठाही त्रिस्तरीय. पहिली कंपनी समुद्राच्या खाली केबल टाकून पुरवठादारांना जगभराशी जोडते. दुसरी, या पुरवठादारांना राष्ट्राशी व तिसरी कंपनी स्थानिक पुरवठादाराशी जोडते.