• Home
  • Russia wants to be the top in diamond excavation

International Special / हीरे उत्खननात रशियाला टॉपवर यायचे आहे, -55 डिग्री सेल्सियसमध्येही खोदकाम करतात कर्माचारी


याकुतिया जगातिल सर्वात ठंड ठिकाण, हिवाळ्यात येथे तापमान -60 डिग्री सेल्सियसपर्यंत जाते

दिव्य मराठी वेब

Jul 17,2019 03:48:00 PM IST

मॉस्को- रशियातील याकुतिया एक असा परिसर आहे, जिथे हिवाळ्यात तापमान -60 डिग्री पेक्षाही कमीवर जाते. येथे हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडते आणि जवळपास 9 महिने येथे बर्फ पसरलेला असतो. याकुतियाच्या मिर्नी शहरात रशियातील सर्वात मोठी हिऱ्याची खाण आहे. हिरे काढण्यासाठी येथील कर्मचारी -55 डिग्री सेल्सियस तापमानही काम करतात. हा जगातील दुसरा सर्वात मोठा मानव निर्मित खड्डा आहे.

याकुतियामध्ये तेल, गॅस आणि बहुमुल्य दगडे आहेत
जुलैमध्ये येथे रात्र लहान होतात आणि तापमान 30 डिग्रीपर्यंत जाते. या परिसरात तेल, गॅस आणि बहुमुल्य दगडं आहेत. रशियातील हिरे कंपनी अलरोसा येथे खोदकाम करते.

सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या मिर्नी या कंपनीने 35000 लोकांना रोजगार दिला आहे. काही स्थानीक लोक कंपनीचा विरोध करतात. त्यांचे म्हणने आहे की, यामुळे पर्यावरणाला धोका पोहचतो. या खाणीची खोली अंदाजे 525 मीटर आहे, तर याचा व्यास 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे.


जगातील सर्वात जास्त हिरे मिळणारी रशियातील खाण बोटुबिन्स्काया 130 मीटर खोल आहे, पण कंपनीने यात 580 मीटरपर्यंत खोदकाम करण्याची योजना बनवली आहे. येथे 6.2 कॅरेटपर्यंतचे हिरे मिळतात. यांच्या नक्षीकामानंतर त्यांना जगभरात पाठवले जातात.


कर्मचारी इरीना सेनयुकोवाने सांगितले- खोदकामावेळेस खाणीचे तापमान -55 डिग्री सेल्सियसपर्यंत जाते. त्यामुळे हिरे काढण्यासाठी विस्पोटकाचा वापर करावा लागतो. खाणीचे डिप्टी चीफ मिकाइल ड्याचेंकोने सांगितले की,- थंडीमुळे मशीन खराब होतात.


1950 मध्ये पहिल्यांदा हिरा मिळाल्यानंतर खाण तयार केली होती. सुरुवातील येथील दर वर्षी एक कोटी कॅरेट (अंदाजे 2000 किलो) हिरे मिळत होते. रशियामध्ये मॉस्को आणि स्मोलेंस्कमध्ये या हिऱ्यांना पॉलीश केले जाते. मागील महिन्यात कर्मचाऱ्यांनी 3 मिलीयन डॉलर (20 लाख) रुपयांचे हिरे चोरले होते.

X
COMMENT