आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळातील या व्‍यक्‍तीने अमेरिकेच्‍या राष्‍ट्रध्‍यक्षाच्‍या मुलीला म्‍हटले, तुला पाहताच मूूड होतो ठिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भलेही डोनाल्‍ड ट्रम्‍प हे जगातील सर्वात सामर्थ्‍यशाली राष्‍ट्राचे अध्‍यक्ष असतील मात्र त्‍यांची मुलगीही काही कमी नाही. तिच्‍या सौंदर्यावर कोट्यावधी लोक फिदा आहेत. आपल्‍या अदांनी तिने सामान्‍य पुरूषांपासून ते आंतरराष्‍ट्रीय सेलिब्रिटी अशा अनेकांना घायाळ केले आहे. आता यात अंतराळवीराचाही समावेश झाला तर काय नवल. तिच्‍या सौंदर्यावर फिदा असलेल्‍या अशाच एका अंतराळवीराने चक्‍क अंतराळातून तिच्‍याबद्दलच्‍या भावना अख्‍ख्‍या जगासमोर व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

 

अंतराळवीर आहे रशियन

सर्वात विशेष बाब म्‍हणजे ईव्‍हांकाच्‍या सौदंर्यामुळे वेडा झालेला हा अंतराळवीर आहे अमेरिकेचा शत्रूराष्‍ट्र मानल्‍या जाणा-या रशियाचा. त्‍याने प्रत्‍यक्ष ईव्‍हांकालाच सर्व जगासमोर आपल्‍या मनातील भावना सांगितल्‍या. त्‍याचे झाले असे की, ईव्‍हांका नुकतीच नासाच्‍या जॉन्‍सन स्‍पेस सेंटरच्‍या दौ-यावर होती. तिने येथून इंटरनॅशनल स्‍पेस स्‍टेशन (ISS) मधील अंतराळविराशी चर्चा केली. यादरम्‍यान रशियाचा अंतराळवीर ओलेग अर्तेमीवने ईव्‍हांकाला म्‍हटले की, 'मी जेव्‍हांही तुम्‍हाला न्‍यूज चॅनेलवर किंवा पेपरमध्‍ये बघतो तेव्‍हा माझा मुड एकदम ठिक होऊन जातो. मला एकदम छान वाटते.'

 

अंतराळवीर बनण्‍याचे आहे स्‍वप्‍न - ईव्‍हांका
यावेळी ईव्‍हांकाने या अंतराळवीरांना प्रोत्‍साहन दिले व त्‍यांना म्‍हटले की, 'तुम्‍ही आता जे काम करत आहात, ते लहानपणापासून करण्‍याची माझी इच्‍छा आहे. लहानपणी माझे अंतराळवीर बनण्‍याचे स्‍वप्‍न होते.'

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, नेमके काय म्‍हटले अंतराळवीराने...


 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...