आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याला सुचली स्वाक्षरी व्यवसायाची भन्नाट आयडिया, इंस्टाग्रामवर सुरु केला बिझनेस; 5 महिन्यात केली 22 लाखांची कमाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को (रशिया) - जगातील बऱ्याच लोकांना स्वतःची स्वाक्षरी आवडत नाही. आपली स्वाक्षरी आकर्षक आणि प्रभावी असावी असे त्यांना नेहमी वाटते. अशीच काहीशी अडचण क्रॉसनोयार्क्समध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थी इवान कुजिनचीसुद्धा होती. इवानला पासपोर्ट बनवण्यापुर्वी  आपली स्वाक्षरी बदलायची होती. त्यामुळे इवानने कॅलिग्राफी शिकलेला आपला मित्र अनास्तासियाची मदत घेण्याचे ठरवले. त्यानंतर अनास्तासियाने इवानसाठी एक स्वाक्षरी डिझाइन केली आणि सोबतच याचे प्रशिक्षणही दिले. यामुळे कुजिनला एक आकर्षक स्वाक्षरी तर मिळालीच पण त्यासोबत एका भन्नाट व्यवसायची कल्पनाही डोक्यात आली. म्हणून त्याने डिझाइन सिग्नेचरचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 

कुजिनने यापूर्वी एक कंपनी रजिस्टर केली होती. त्यामुळे नवीन व्यवसायासाठी त्यांनी ''राइट-राइट'' नावाने इंस्टाग्राम हँडल बनवले आणि 15 हजार रुबल (16 हजार रुपये) ऑनलाइन मार्केटिंगवर केले. त्यानंतर 12 तासातच त्यांना आपले पहिले काम मिळाले. जेव्हा ग्राहकांची संख्या 40 पर्यंत गेली तेव्हा कुजिन आणि अनास्तासिया यांनी आणखी एक कॅलिग्राफी आर्टिस्टला नियुक्त केले. डिसेंबर 2018 मध्ये राइट-राइट या कंपनीची सुरूवात झाली. तसेच यावर्षी कंपनीचा रेव्हेन्यू 30,500 डॉलर (सुमारे 22 लाख रुपये) पर्यंत पोहचला आहे.


ग्राहकांना दिले जातात 10 सिग्नेचर
कंपनीकडे संपर्क केल्यानंतर ग्राहकांचा संपूर्ण प्रोफाइल तपासला जातो. त्यानंतर ग्राहकांचे शिक्षण आणि व्यवसायाच्या आधारावर त्याला 10 स्वाक्षऱ्या दिले जातात. तरीही त्यामधून एकही सिग्नेचर ग्राहकाला आवडले नाही, तर कंपनी आणखी दहा पर्याय देते. स्वाक्षरी आवडल्यानंतर कंपनी सिग्नेचरसाठी शैक्षणिक माहिती तयार करते. त्यानंतर स्वाक्षरीवर पकड कशी मजबूत करावी हे ग्राहकांना समजावून सांगितले जाते. बेसिक डिजाइनर सिग्नेचरसाठी कंपनी ग्राहकांकडून सध्या 5 हजार रुबल (5,300 रुपये) शुल्क आकारले जात आहे.

 

कॅलिग्राफी आणि हँडरायटिंग कोर्सद्वारे वाढवणार कंपनीचा रेव्हेन्यू 
या कंपनीमध्ये सध्या आठ कर्मचारी काम करत आहेत. कुजिन यांनी कंपनीची स्ट्रॅटजी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, व्यवस्थापनाची जबाबदारी संभाळली आहे. तर, अनास्तासिया हे आर्टिस्टिकशी संबंधीत काम पाहतात. कुजिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कंपनीला जेवढ्या ग्राहकांनी भेटी दिल्या आहेत त्यापैकी अधिकतर मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गसारख्या शहरातून आलेले आहेत. सध्या कंपनीला जर्मनी, ब्रिटेन, इजराइल आणि अमेरिकेमधूनही काही ऑर्डर मिळाल्या आहेत. तसेच, त्यांनी सांगितले की, कंपनी आगामी काळात कॅलिग्राफी आणि हँडरायटिंग संबंधीत कोर्स सुरू करणार आहे.