आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन तरुणीला किडनॅप करून गँगरेप, पर्यटनानंतर हॉटेलमध्ये परतत होती, नराधमांनी घातली झडप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाली - हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटननगरी मनालीमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मनाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, गुरुवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावरून चालत जात असलेल्या एका रशियन पर्यटक तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले.

 

असे आहे प्रकरण

पोलिस सूत्रांनुसार, पीडिता पर्यटक तरुणी दोन-तीन दिवसांपूर्वीच मनालीला फिरण्यासाठी आली होती. रविवारी रात्री ती एकटीच जुन्या मनाली शहरात जात होती. तेवढ्यात दोन अज्ञातांनी तिचे अपहरण करून एका निर्मनुष्य जागेवर नेले आणि तिच्यावर गँगरेप केला.

गँगरेप पीडित तरुणीने सांगितलेल्या माहितीनुसार या घटनेत नेपाळवंशीय 2 जण सहभागी असू शकतात. आरोपींबाबत पोलिस सध्या जास्त माहिती देत नाहीयेत.

 

काय म्हणतात पोलिस?

कुल्लूच्या पोलिस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री म्हणाल्या की, गँगरेप पीडिता आरोपींना ओळखत नाही. जेव्हा तिच्यावर बलात्कार झाला, तेव्हा ती आपल्या हॉटेलकडे परतत होती. पोलिस सध्या घटनास्थळाच्या आसपास लागलेल्या मोबाइल टॉवरच्या जवळ अॅक्टिव्ह असलेल्या मोबाइल फोनचा डाटाही शोधत आहेत.

पोलिसांच्या मते, ही सर्व घटना अंधारात झाली. आसपास कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत.

 

यापूर्वीही घडल्या विदेशी महिलांवर बलात्काराच्या घटना

ही पहिलीच घटना नाही. कुल्लू आणि मनालीसारख्या पर्यटन स्थळांवर विदेशी महिलेला यापूर्वीही वासनेची शिकार बनवण्यात आलेले आहे. यापूर्वीही अनेकदा विदेशी महिलांसोबत लूटमार आणि गँगरेपसारख्या घटना घडलेल्या आहेत.

मे 2018 मध्ये जपानी तरुणीवर कुल्लूजवळच एका ड्रायव्हरने बलात्कार केला होता. दुसरीकडे 2016 मध्ये इस्रायलच्या महिला पर्यटकावर रेप झाला होता. त्यापूर्वी 2013 मध्ये नेपाळवंशीय तिघांनी एका अमेरिकी महिलेची लूट करून गँगरेप केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...