आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्षांपासून पडलेल्या या कारला भंगार समजत होते लोक, कंपनीकडे नेल्यानंतर किंमत ऐकून झाले चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सस - येथील डलाश शहरात खूप वर्षांपासून गंज लागलेल्या कारकडे बघून लोक भंगार वस्तू समजत राहिले. परंतु कारचा मालक ही कार कंपनीकडे घेऊन गेला. कंपनीने या कारची किंमत सांगितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ही कार 1958 मध्ये बनवण्यात आली होती परंतु खरेदी करणाऱ्या व्यक्तीने काही कारणामुळे 1983 पासून कार चालवणे बंद केले. परंतु कंपनीने या कारची किंमत कोटीच्या घरात सांगितली.


- ही कर पोर्शची 1600 सुपर स्पीडस्टर आहे. त्याकाळातील ही सर्वात फास्ट कार होती. ज्या व्यक्तीने ही कार सेकंड हॅन्ड खरेदी केली होती, तो कारला पुन्हा तयार करून चालवणार होता परंतु काही कारणामुळे हे शक्य झाले नाही आणि कार तशीच पडून राहिली.


कंपनीने केले चकित
- या कारला भंगार समजून गाडीचा मालक कंपनीकडे विकण्यासाठी घेऊन गेला आणि कंपनीच्या गोष्टी ऐकून तो आश्चर्यचकित झाला. त्याला सांगण्यात आले की, ही पोर्शची सर्वात उत्तम स्पोर्ट्स कार असून एखाद्या व्हिंटेज कारपेक्षा कमी नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये कार विकली तरी तिचे जवळपास सव्वा लाख पाउंड म्हणजेच 1 कोटी 20 लाख मिळतील. हे ऐकून कारचा मालक आवक् झाला कारण वर्तमानात मिळणाऱ्या पोर्शच्या स्पोर्ट्स कारपेक्षा ही किंमत जास्त होती. या कराची एवढी किंमत कशी काय असे त्याने कंपनीला विचारले.


- कंपनीने सांगितले की, हे अत्यंत रेअर मॉडेल आहे आणि कंपनीला हे परत पाहिजे. आर एम सोथ्सबे कंपनीने ही कार खरेदी करून पुन्हा रीस्टोर करण्याचा निश्चय केला. त्यानंतर या कारचा पोर्शच्या वार्षिक सेलिब्रेशनमध्ये लिलाव केला जाईल.


खर्च होणार लाखो रुपये 
- रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले की, कोटींमध्ये विकल्या गेलेल्या या भंगार कारची अवस्था अत्यंत वाईट आहे. यामध्ये इंजिन व्यक्तिरिक्त काहीही शिल्लक नाही. बॉडी पूर्णपणे झिजून गेली आहे. कंपनी ही कार पुन्हा बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करणार आहे. 27 ऑक्टोबरला जॉर्जिया येथे होणाऱ्या पोर्शच्या 70 व्या वार्षिक कार्यक्रमात कारचा लिलाव केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...