inspiration / रात्री मुलांचा गृहपाठ घ्यायच्या आणि पहाटे ४ वाजेपर्यंत काम करायच्या

चांद्रयान-२ च्या प्रकल्प संचालक एम वनिता यांच्याबराेबर माेहीम संचालक म्हणून या माेहिमेचे नेतृत्व केल

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 15,2019 10:51:00 AM IST

ऋतू करीधल, संशाेधक, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन

शिक्षण- फिजिक्समध्ये एमएस्सी (लखनऊ विद्यापीठ), एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमटेक (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू)


चर्चेत का- चांद्रयान-२ च्या प्रकल्प संचालक एम वनिता यांच्याबराेबर माेहीम संचालक म्हणून या माेहिमेचे नेतृत्व केले अाहे.

२०१२ च्या शेवटच्या महिन्यामध्ये इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशनच्या (इस्राे) संशाेधकांची एक टीम महत्त्वपूर्ण माेहीम पूर्ण करून जरा काेठे निवांत झाल्या हाेत्या ताेच त्यांच्यावर मंगळयान माेहिमेची जबाबदारी साेपवण्यात आली. या मोहिमेच्या उपसंचालिका ऋतु करीधल यांच्यावर मंगळयानाच्या ब्रेन काेडिंगची जबाबदारी देण्यात आली हाेती. करीधल यांच्यासाठी ही माेहीम दहा महिन्यांच्या एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हती. संध्याकाळी घरी गेल्यावर मुलांचा गृहपाठ, दिवसभरातली सर्व कामे उरकल्यानंतर रात्री १२ ते सकाळी ४ वाजपर्यंत घरीच काम करायच्या. ५ नाेव्हेंबर २०१३ ला इस्राेने मंगळयान अंतराळात साेडले. करीधल यांनी आपल्या टीमच्या सहकार्याने अवघ्या १० महिन्यांतच मंगळयान यशस्वीपणे अंतराळात पाठवले त्यानंतर ऋतू प्रकाशझाेतात आल्या. त्यांना टॅड टाॅकमध्ये वक्ता म्हणून बाेलावण्यात आले. महाविद्यालयातूनही व्याख्यानासाठी प्रस्ताव आले. मंगळयान ही आपल्या जीवनातील संस्मरणीय माेहीम असून ते दिवस संघर्षपूर्ण पण अविस्मरणीय हाेते, असे त्या म्हणतात. सामान्य गृहिणीप्रमाणे करीधल आपल्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करतात. मुलांचे जेवण करणे, त्यांच्याशी खेळणे- बागडणे हा त्यांच्या जीवनाचा भाग आहे. ऋतू म्हणतात, महिला म्हणून काम आणि जीवनात समताेल राखण्यात कधी अडचण आली नाही. त्यांची प्राथमिकता कामाला आहे तेवढीच कुटुंबासाठी आहे. लखनऊमध्ये बालपण गेलेल्या ऋतू यांचे वडील संरक्षण क्षेत्रात कार्यरत हाेते.मध्यमवर्गीय कुटुंब, बेताची आर्थिक स्थिती यामुळे तिच्या आई-वडिलांचा नेहमी अभ्यासावर जाेर असायचा. शिकवणी लावण्यासाठी घरी अनुकूल नव्हते. स्वत: अभ्यास करून स्वत:लाच प्राेत्साहन त्या द्यायच्या. रात्री गच्चीवर चंद्र-तारे, अंतराळ हेच विचार नेहमी त्यांच्या डाेक्यात यायचे. त्यामुळे भविष्यात हेच क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला. या क्षेत्राची माहिती गाेळा करण्यास सुरुवात केली बातम्या, लेख ती कापून ठेवायच्या. अंतराळाशी संबंधित बातम्या लक्षपूर्वक एेकायच्या. लखनऊ विद्यापीठातून फिजिक्स विषयात एमएस्सी केले. नंतर ‘गॅट’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. गॅट उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी बंगळुरूमध्ये एमटेकसाठी प्रवेश घेतला आणि नंतर १९९७मध्ये त्या इस्राेमध्ये नाेकरीला लागल्या. २००७मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्राे यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

X
COMMENT