आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक देश सोडल्यास सर्व शेजाऱ्यांशी भारताचे चांगले संबंध : जयशंकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एक देश सोडल्यास सर्व शेजारी देशांसोबत भारताचे चांगले क्षेत्रीय संबंध आहेत. त्याची चांगली कहाणी सांगता येऊ शकेल. अमेरिकेसोबतच्या चर्चेत काश्मीरचा मुद्दा समोर आला नव्हता, असे सांगून भारताचा राष्ट्रवादी जगाच्या विरोधात नाही, अशी स्पष्ट भूमिका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडली आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी शुक्रवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून पाकिस्तानवर निशाणा साधला. जयशंकर पुढे म्हणाले, खरे तर राष्ट्रवाद जगाविषयी नकारात्मक भावना दर्शवत नाही. भारत नेहमीच इतर देशांसोबतच संबंध चांगले ठेवण्याच्या धोरणावर वाटचाल करत आहे. तुम्ही स्वत:चा विकास केला तर जगासाठी देखील तुम्हाला जास्त काम करावे लागेल, हाच भारतीयांचा विचार आहे. जगावर प्रभाव टाकायचा असल्यास आधी शेजाऱ्यांना मदत अपेक्षित असते. भारत नेहमीच विकासासाठी भागीदारी करत आला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. आफ्रिकेच्या लोकांना काय हवे हे त्यांनी सांगावे, असे आवाहन तेव्हा मोदींनी तेथील जनतेला केले होते, याचे स्मरणही जयशंकर यांनी याप्रसंगी करून दिले. 


चीनचा वन बेल्ट - वन रोड
कसलाही प्रकल्प असो, सार्वभौमत्वाशी तडजोड न
ाही
जयशंकर यांनी चीनवरही टीका करताना पाकचाही समाचार घेतला. वन बेल्ट वन रोड प्रकल्पात भारत सहभागी होणार नाही. भारत सार्वभौमत्वाबाबत तडजोड करणार नाही, असे जयशंकर यांनी एका प्रश्नावर सांगितले. पाकिस्तान चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी आहे. हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. 


अफगाण संबंधाबाबत 
भारताने केलेल्या मदतीची अफगाणींना पूर्ण ज
ाणीव 
भारताने इतर देशांच्या तुलनेत खूप काही केले आहे, याची अफगाणिस्तानला जाणीव आहे. फोरममध्ये जयशंकर यांनी अफगाणिस्तानबद्दलही भूमिका मांडली. अफगाणिस्तानला जाऊन बघा. तेथे भारतासोबतच्या संबंधाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. त्याबद्दल कधीही माध्यमांतून आलेले नाही. 

तुर्की व मलेशियाला सल्ला- काश्मीरची परिस्थिती समजून घ्या
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी तुर्की व मलेशियाने काश्मीरची परिस्थिती समजून घेऊनच वक्तव्य करावे, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याचा परिणाम मैत्रीपूर्ण संबंधावरही होऊ शकतो, याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जम्मू-काश्मीरबाबत भारताने घेतलेला निर्णय पूर्णपणे अंतर्गत स्वरूपाचा आहे. भारताचे पंतप्रधान व परराष्ट्र मंत्र्यांनी अनेकवेळा या बाबतची तथ्ये मांडली आहेत. जम्मू-काश्मीरने भारतासोबत विलीनीकरणाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली होती. पाकिस्तानने त्यावर हल्ला केला व जम्मू-काश्मीरचा एक भाग ताब्यात घेतला. ही बाब संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील मान्य केली आहे.

बातम्या आणखी आहेत...