आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक क्षण हीच नवी सुरूवात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटस्फोट किंवा जोडीदारापासून कायमची ताटातूट ही कुण्याही स्त्रीसाठी सोपी गोष्ट नसतेच. मात्र, आयुष्यात सोबत नाही म्हणून आयुष्य थांबत नसते. मग करायचे काय? अशा वेळी आयुष्याच्या गतीशी मिळतं-जुळतं घ्यायचं. चालत राहणं आपोआप जमतं... विभक्त झालेल्या आपल्या एका मैत्रिणीचा हा स्वानुभव तिच्याच शब्दांत...

सगळे म्हणत होते...झालं-गेलं विसरून जा. पण मी सगळं नीट लक्षात ठेवलं. कुणी साेडून दिलं अर्ध्या वाटेत तर उरलेला दुसरा जीवनात पुढे कसा जाऊ शकेल? माझे ५ वर्षांपूर्वीचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. घटस्फाेटाची प्रक्रिया सुरू झाली हाेती. नैराश्यात बुडाल्याने मी सर्वांच्या चिंतेला आणि टीकेलाही कारणीभूत ठरले हाेते. घरातील सर्व जण सांगायचे, जीवनात दुसरे काही करण्याचा विचार कर. नवे काही शिक. तुझे मन रमव. म्हणजे तुला जुन्या आठवणी विसरणे शक्य हाेईल. ५ वर्षांचे वैवाहिक जीवन व त्यापूर्वीच्या तीन वर्षांच्या मैत्रीचा ताे अविस्मरणीय काळ कसा काय विसरला जाऊ शकेल? हेच मला कळत नव्हते. 


माझी तगमग हाेत हाेती. काय करू सुचत नव्हते. माझी अवस्था पाहून आप्तेष्टांपैकीच एकानं ‘काॅग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी’ सुचवली. सीबीटी हा एक मानसाेपचार आहे. ज्याच्या माध्यमातून मनुष्य स्वत:च्या मनातील नकारात्मक विचारांचे सकारात्मक विचारांत रूपांतर करू शकताे. मी तो अमलात आणलाय. माझ्यासारखंच इतर कुणी या दु:खातून जात असेल तर त्यालाही ते उपयोही पडू शकेल म्हणून या लिखाणाचा खटाटोप...


पहिला टप्पा :  स्वजाणीव ओळखा 

फसवणुकीच्या दु:खाची तीव्रता प्रत्येकासाठी वेगळी असते. बाॅयफ्रेंडशी ब्रेकअपमुळे, तर कधी गर्लफ्रेंडशी काडीमाेडामुळे हे दु:ख निर्माण हाेते. कुणाला नातेवाइकांकडून झालेल्या फसवणुकीमुळे हे दु:ख भाेगावे लागते. मी व माझा पती आम्ही दाेघांनी परस्परांसाेबत नवे आयुष्य सुरू केले हाेते. आणि आता मी केवळ भावनात्मकच नव्हे, तर आर्थिक व सामाजिक पातळीवरही जीवनात पुन्हा उभे राहण्यासाठी धडपडत हाेते. मी निराश हाेते. माझा नवरा दुसऱ्या महिलेशी लग्न करेल, हा विचारच मला पुन्हा उभा राहू देत नव्हता. आणि सीबीटीचा हाच पहिला टप्पा होता,  स्वत:च्या दु:खाला, जाणिवेला ओळखणं. त्याला नाव देणे. मी दिले- निराशा, नाराजी, भीती, चीड व उदासीनता. 


दुसरा टप्पा : जाणिवेमागे काय ? 

हा खूपच महत्त्वाचा भाग हाेता. हे बरोबर आहे की मी उदास हाेते, निराश हाेते, घाबरलेले हाेते; तर मग आता मला काय करायचं होतं? या जाणिवेपलीकडे जाऊन त्याचे सर्व धागे पकडायचे हाेते.  मी उदास का हाेते? कारण पतीने मला पुरेसे महत्त्व दिले नव्हते, आम्ही वेगळे झालाे हाेताे म्हणून? निराश हाेते. कारण पतीने दिलेली आश्वासने पाळली नव्हती. भयग्रस्त हाेते. कारण एकदा पुन्हा एकटेपणा जाणवू लागला हाेता. यामुळे माझा आत्मविश्वास दुखावला होता. जवळच्या व्यक्तीने साेडून दिल्यास पराभूत झाल्यासारखे वाटते. मी त्याच्याशी खूप बाेलण्याचा प्रयत्न केला, त्याची प्रतीक्षाही केली. परंतु त्याला माझी किंमत नव्हती. हा दुसरा टप्पा, मी माझे दु:ख पडताळून पाहिले. 

 

तिसरा टप्पा : नकारात्मकतेचे कारण समजून घ्या 

माझी नकारात्मकता स्पष्टच हाेती. खराेखर या सर्वांचा माझ्याशी संबंध हाेता काय? प्रत्येक भावनेचा एक क्रम ठरवणे, हा या टप्प्याचा उद्देश हाेता. त्यामुळे या थेरपीला सुरुवात केल्यावर प्रत्येक भाव व्यवस्थितरीत्या समजून घ्यावा लागला. भीती का आहे? निराश का आहे? राग, निराशा किंवा उदासीनता यापैकी काेणत्या भावनेचे प्रमाण जास्त आहे? याचे विश्लेषण करत असताना लक्षात आले की, मी माझ्या पतीची खूपच जास्त वाट पाहिली हाेती; कदाचित प्रमाणापेक्षा जास्त. ताे मला काहीही महत्त्व देत नव्हता. मी मात्र त्याला स्वत:पेक्षा जास्त महत्त्व दिले हाेते, तेही स्वत:ला पूर्णपणे विसरून! 


याचदरम्यान माझ्या हेदेखील लक्षात आले की, माझी फसवणूक करताना माझा पती स्वत:ही खूपच एकटा व असहाय पडत चालला हाेता. त्यामुळे ताे जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहण्याचा प्रयत्न करत हाेता. मी त्याच्यासाठी महत्त्वाचे नव्हते व असे माझ्यामुळे नव्हे, तर त्याच्या स्वत:च्या वागण्यामुळे हाेत हाेते. यात माझी काहीही चूक नव्हती, असेही म्हणता येऊ शकत हाेते. प्रत्येक नकारात्मक भावनेच्या विश्लेषणाने मला जणू त्या भावनेपासून मुुक्तताच मिळवून दिली.  


चाैथा टप्पा : दोषी समजू नका

घटस्फाेटासाठी स्वत:ला दाेषी ठरवत नसेल अशी क्वचितच एखादी पत्नी असेल. पुरुष स्वत:च यासाठी महिलांना दाेष देत असतात व यात उरलीसुरली कसर महिला स्वत:च पूर्ण करत असते. लग्न माेडण्याचा दाेष स्वत:कडे घेणे साेपे काम नाही; नाते दाेन व्यक्तींदरम्यान हाेते; दाेन परिपक्व, शिक्षित व समजदार व्यक्ती. नाते निभावण्याची जबाबदारी दाेघांच्या खांद्यावर असते. मग यात एकालाच कसे दाेषी ठरवता येईल? हा टप्पा पूर्ण हाेता होता मला हलकं वाटू लागलं. कारण माझी काेणतीही चूक नव्हती. 


पाचवा टप्पा : प्राधान्यानं करा 

आता या टप्प्यात मागचं सर्व विसरून पुढे चालण्यासाठी उभं राहण्याची वेळ आली होती.  मीदेखील मनाने तयार झाले हाेते. त्यामुळे सर्वप्रथम मी पतीचा फाेन नंबर ब्लाॅक करून टाकला. त्यानंतर त्याच्या फेसबुुक अकाउंटमधून बाहेर पडले. स्वत:चं जीवन पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी ताे जितका उतावीळ झाला हाेता, त्यापेक्षा किती तरी जास्त घाई व उत्कंठा मला होती.  हे जाणून घेण्यासाठी की, जीवनाकडे माझ्यासाठी काय आहे

बातम्या आणखी आहेत...