आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायकी सोडून नशेच्या आहारी गेला होता 'सारेगामापा लिटिल चॅम्प्स'चा विजेता; हरवलेली ओळख मिळवण्यासाठी 'इंडियन आयडल'मध्ये दिले ऑडिशन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क - 2011 मध्ये 'सारेगामापा लिटिल चॅम्प्स' शो जिंकलेला अजमत हुसैन 2019 मध्ये सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल'मद्ये ऑडिशन देण्यासाठी पोहोचला. यावेळी अजमतने या 8 वर्षांत त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगितल्या. अजमत ने सांगितले की, 'शो जिंकल्यानंतर ज्याप्रकारे विचार केला होता त्याप्रमाणे आयुष्य नव्हते. सारेगामापा जिंकल्यानंतर अनेक शो केले. काम ही मिळत होते. मात्र घरच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या.' 
 

 

आवाज बदलल्यानंतर लोकांनी फिरवली पाठ
वाढत्या वयामुळे अजमतचा आवाजात बदत होत होता. यामुळे अनेक लोक त्यांच्या गाण्यावर त्याला बोलत होते. त्याचा आवाजाला नावं ठेवत होते. यामुळे अजमत तणावात गेला आणि त्याने गाणे सोडले. अजमतने तब्बल तीन वर्ष गाण्यापासून दूर राहिला. त्याला कोणते गाणे ऐकायला आवडत नव्हते. 

स्वतःच्या आवाजाचा झाला होता तिरस्कार
अजमतने शो दरम्यान सांगितले की,"तणावामुळे तो वाईट संगतीत गेला आणि नशेच्या आहारी गेला. कधी-कधी गाणे गाण्याची मनातून इच्छा व्हायची पण मी न गाण्याचे ठरवले. मला माझ्याच आवाजाचा तिरस्कार झाला होता." 

हरवलेली ओळख मिळवण्यासाठी आलो आहे
अजमतने जजेसला सांगितले की, मागच्या सीझनमध्ये त्याने सलमान अलीला बघितले होते. यामुळे आपणही काहीतरी केले पाहिजे अशी अपेक्षा जागृत झाली. यामुळे मी माझी हरवलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी ऑडिशन देण्यासाठी आलो आहे. अजमतने ऑडिशनमध्ये 'मैं हवा हूं कहां वतन मेरा...' ही गझल गायली.

बातम्या आणखी आहेत...