आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साहो'चा दिग्दर्शक सुजीतने मोडला रोहित शेट्टीचा विक्रम, चित्रपटात 30 पेक्षा अधिक गाड्या केल्या ब्लास्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या चित्रपटांत गाड्या उडवण्याच्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. पण आता या बाबतीत 'साहो'च्या दिग्दर्शकाने रोहित शेट्टीचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने आपल्या चित्रपटांत अॅक्शनसाठी डझनभर गाड्यांचा स्फोट केला होता. तर 'साहो'मध्ये सुजीतने तब्बल 30 पेक्षा अधिक ट्रक आणि गाड्यांना ब्लास्टमध्ये उडवले आहे. साहो चित्रपटाचे अॅक्शन सीन्स अॅव्हेंजर्स आणि ट्रान्सफॉमर्स सारख्या चित्रपटांचे अॅक्शन डिझाइन केलेल्या टीमने डिझाइन केले आहे. 

 

संस्कृतमधून घेतले आहे चित्रपटाचे टायटल
मजेशीर बाब म्हणजे या चित्रपटाचे टायटल 'साहो' एक संस्कृत शब्द आहे. एखाद्याची प्रशंसा करत राहणे असा या शब्दाचा अर्थ आहे. बॉलीवूड मध्ये पहिल्यांदा एखाद्या चित्रपटाचे टायटल संस्कृतमधून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूरला घेण्याची कल्पना देखील दिग्दर्शक सुजीतची होती. 

 

 

बातम्या आणखी आहेत...