आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Show Saath Nibhaana Saathiya Actress Firoza Khan Engaged To Her Dubai Based Real Estate Businessman Boyfriend

दोनदा प्रेमभंग झाल्यानंतर तिस-या बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, 'साथ निभाना साथिया'च्या या अॅक्ट्रेसचा भावी पती आहे दुबईतील रिअल स्टेट बिझनेसमॅन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'साथ निभाना साथिया' या गाजलेल्या मालिकेत किंजलची भूमिका वठवणारी अभिनेत्री फिरोजा खान हिने अलीकडेच साखरपुडा केला. मंगळवारी बॉयफ्रेंड सोहेल खंडवानीसोबत तिचा साखरपुडा झाला. सोहेल हा दुबईतील रिअल स्टेट बिझनेसमन आहे. स्वतः फिरोजाने सोशल मीडियावर भावी पतीसोबतचा फोटो पोस्ट करुन साखरपुड्याची बातमी दिली. फिरोजाने फोटोला कॅप्शन दिले, "I m so ready for our future together.. @sohelllllllllll I love you" मागील दीड वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची पहिली भेट व्हॅलेंटाइन डेला झाली होती.


वाढदिवशी फिरोजाने केली घोषणा... 

- फिरोजाने एका एंटरटेन्मेंट साइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "होय, सोहेल आणि माझा साखरपुडा झाला आहे. या खास दिवसाची घोषणा करण्यासाठी मी आतुर होते. यासाठी मी माझ्या वाढदिवसाची निवड केली." 
-  फिरोजा मुस्लिम कुटुंबातील तर तिचा भावी पती सिंधी आहे.

 

दोनदा झाला होता फिरोजाचा प्रेमभंग...
- 2015 मध्ये फिरोजा दुबई बेस्ड शकीर चौधरीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. फेब्रुवारी 2015 रोजी दोघांनी साखरपुडाही केला होता. पण लवकरच त्यांचे नाते संपुष्टात आले.
- त्यानंतर डॉक्टर जीशान खानसोबत फिरोजा रिलेशनशिपमध्ये आली. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये हे दोघे वेगळे झाले.
- फिरोजाने 'कोई लौट के आया है' आणि 'जाना न दिल से दूर' या टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...