आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोची - फेसबुकच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. सबरीमाला मंदिरात प्रवेशावरून फातिमा चर्चेत होत्या.
३२ वर्षीय फातिमा बीएसएनएलमध्ये काम करतात. पोलिस म्हणाले, राधाकृष्ण मेनन नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून फातिमा यांच्या विरोधात पथनमथिट्टामध्ये खटला दाखल करण्यात आला होता. त्यांना कोचीच्या पलारीवोत्तोम येथील कार्यालयात अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना पोलिसांनी पथनमथिट्टा येथे नेले आहे.
सप्टेेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वर्षीय महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याचा अधिकार प्रदान केला होता. ऑक्टोबरमध्ये मासिक पूजेसाठी मंदिर खुले झाले तेव्हा फातिमाने तेथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना मज्जाव करण्यात आला होता.
त्यावरून केरळमध्ये वादंग निर्माण झाले होते. अटकेच्या शक्यता लक्षात घेऊन फातिमा यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळली. पोलिस या प्रकरणी योग्य ते पावले उचलू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.