आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sabarimala Bomb Attack On BJP, CPM Leaders Homes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सबरीमालात माकप आणि भाजप नेत्यांच्या घरांवर बॉम्ब हल्ले; आतार्पंयत 1700 हून अधिक आंदोलकांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्याच्या घटनेनंतर केरळात हिंसक आंदोलन आणखी चिघळले आहे. यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर शुक्रवारी रात्री उशीरा आंदोलकांनी बॉम्ब हल्ले केले आहेत. माकप आमदार एएन शमसीर, स्थानिक नेते पी. शशी आणि भाजप खासदार व्ही मुरलीधरन यांच्यासह कार्यकर्त्यांच्या घरांवर सुद्धा अशा स्वरुपाचे हल्ले झाले आहेत. माकप नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांसाठी डावे राष्ट्रीय स्वयंसेवर संघावर आरोप लावत आहेत. तर दुसरीकडे, आपल्या नेत्यांच्या घरांवर हल्ले करणारे डावेच असल्याचे भाजपचे आरोप आहेत. राज्यात ठिक-ठिकाणी सुरू असलेल्या या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 1738 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

 

 

#UPDATE Police have arrested 20 people in connection with the violence in Kannur district, last night. #Kerala https://t.co/QYeL1agiL5

— ANI (@ANI) January 5, 2019

 

मोदींचा केरळ दौरा स्थगित
हिंसक आंदोलने सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारचा केरळ दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजपच्या एका स्थानिक नेत्याने ही माहिती दिली. पीएम मोदींचा पठानमथिट्टा दौरा 6 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु, काही कारणास्तव दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. याचा केरळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाशी काहीही संबंध नाही असा दावा संबंधित नेत्याने केला आहे.

 

गुरुवारी श्रीलंकन महिलेने केला प्रवेश करण्याचा प्रयत्न
केरळच्या सबरीमाला मंदिरात श्रीलंकेच्या 46 वर्षीय महिलेने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिला पायऱ्यांवरच थांबवण्यात आले. महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिने आपल्या रजोनिवृत्त असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा दाखवले तरीही तिला प्रवेश देण्यात आला नाही. तत्पूर्वी 2 जानेवारी रोजी 50 वर्षांच्या आतील दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केला. यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी महिला भाविकांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. तेव्हापासूनच राज्यात निदर्शने सुरू आहेत.