आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sabarimala : Let's Look At Preserving Traditions; Role Of The Agitating Organization

आजपासून मंदिर पुन्हा खुले होणार; परंपरांचे जतन व्हावे याकडे लक्ष ठेवू; आंदोलनकर्त्या संघटनेची भूमिका

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आंदोलन करणाऱ्या ६५ हजार भक्तांवर खटले सुरू
  • सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिला होता

नवी दिल्ली - सबरीमाला मंदिर मंगळवारी पुन्हा उघडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही कुठल्याही प्रकारे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी मंदिरात आणि मंदिराच्या सभोवती सगळीकडे लक्ष ठेवू, असे प्रतिपादन मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनेने सोमवारी केले.

अखिल भारतीय सबरीमाला कृती परिषदेने (एआयएसएसी) सोमवारी एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, अलीकडेच पार पडलेल्या मंडलम हंगामात (डिसेंबर २७) १० ते ५० वर्षे या वयोगटातील कुठल्याही महिलेने भगवान अय्यप्पा यांच्या मंदिरात प्रवेश केला नाही. केरळच्या पथिनमथिट्टा जिल्ह्यात असलेल्या भगवान अय्यप्पा यांचे मंदिर मंगळवारी पुन्हा मकर विलक्कू हंगामासाठी खुले होणार आहे. या हंगामात या मंदिराचे पावित्र्य, परंपरा, धार्मिक यांचे कुठल्याही परिस्थितीत संरक्षण केले जाईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे एआयएसएसीचे सरचिटणीस एस. जे. आर. कुमार यांनी म्हटले आहे.कोचिन येथून दूरध्वनीवर बोलताना कुमार म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि धार्मिक परंपरांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी आम्ही मंदिरात आणि मंदिर परिसरातही लक्ष ठेवू. सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिला होता. मात्र हा निकाल म्हणजे ‘अंतिम शब्द’ नाही, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी ५ डिसेंबरला म्हटले होते आणि हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठवले होते. कुमार यांनी सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याचे स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या पीठाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी ४-१ अशा बहुमताने सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निकाल दिला होता. शरीरशास्त्राच्या आधारावर भेदभाव करणे म्हणजे समानतेच्या हक्कासारख्या मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे, असे निकालात नमूद करण्यात आले होते. केरळ सरकारने निकालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एआयएसएसी आणि इतरांनी मंदिराच्या परंपरांत कुठलाही बदल करण्यास विरोध करत आंदोलन सुरू केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी १४ नोव्हेंबरला म्हटले होते की, सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशासह इतर धार्मिक मुद्द्यांची फेरतपासणी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाद्वारे करण्यात येईल.आंदोलन करणाऱ्या ६५ हजार भक्तांवर खटले सुरू : कुमार
 
सर्व वयोगटाच्या महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या विरोधात असंख्य भक्तांनी गेल्या वर्षी आणि या वर्षीही सर्व मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली आहेत.  अशी निदर्शने करणाऱ्या सुमारे ६५ हजार भक्तांवर केरळमधील विविध न्यायालयांत फौजदारी खटले सुरू आहेत, असा दावा कुमार यांनी केला. ते म्हणाले की, मंदिराचे पावित्र्य जपले जावे यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा यापुढेही सुरूच ठेवणार आहोत. महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा मुद्दा हा लहान मुद्दा नाही. या प्रकरणात जगभरातील अय्यप्पा भक्तांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहोत. देशभरात अय्यप्पाची ३ हजार मंदिरे आहेत, पण अय्यप्पांसाठी सबरीमाला हे एकमेव मंदिर आहे, अशा शब्दांत कुमार यांनी सबरीमालातील परंपरांचा उल्लेख केला.