आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमाला मंदिर प्रकरण: महिला प्रवेशाचा निर्णय कायमच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम/नवी दिल्ली- सर्वाेच्च न्यायालयाने केरळमधील सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबतचा अापला निर्णय स्थगित करण्यास बुधवारी नकार दिला. मात्र, याप्रकरणी प्रवेशाला सूट दिल्याच्या मुद्द्यावर दाखल असलेल्या पुनर्विचार याचिकांवर सुनावणी करण्यास तयारी दाखवून त्यासाठी २२ जानेवारी २०१९ ची तारीख निश्चित केली अाहे.


सर्वाेच्च न्यायालयाने गत २८ सप्टेंबरला सर्व वयाेगटातील महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याचा अादेश दिला हाेता. मात्र, केरळमध्ये भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी यास विराेध करून हा निर्णय मागे घेण्याची मागणी सर्वाेच्च न्यायालयाकडे केली अाहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार सबरीमाला मंदिरात १० ते ५० वयाेगटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही. दरम्यान, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी या प्रकरणात इतर भाविकांना कसलाही त्रास हाेऊ नये म्हणून पावित्र्याचे भान ठेवण्याचे अावाहन केले अाहे. तसेच गरज पडल्यास केंद्र सरकार या प्रकरणाची याेग्य वेळी दखल घेईल, असेही शर्मांनी स्पष्ट केले.  

 
मंदिरात प्रवेशाची तृप्ती देसाईंची घाेषणा : न्यायालयाच्या या निर्णयानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी येत्या १७ नाेव्हेंबरला सबरीमाला मंदिरात इतर सहा महिलांसाेबत प्रवेश करणार असल्याची घाेषणा केली अाहे. त्यासाठी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांना पत्र लिहून अावश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...