आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगरात नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी; 32 वर्षांचा विक्रम मोडला, कुलू-मनालीत बर्फवृष्टी सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला/श्रीनगर/डेहराडून - जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडातील काही भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. हिमाचलमधील मनाली व नारकंडा येथील पर्यटनस्थळी बुधवारी रात्री उशिरा या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. कुलू-मनाली येथील रोहतांग येथे ३ फूट बर्फवृष्टी झाली. दरम्यान, श्रीनगरात नोव्हेंबर महिन्यात बर्फवृष्टीचे गेल्या ३२ वर्षांचा विक्रम मोडीत निघाला. काश्मीर खोऱ्यात या मोसमातील पहिली बर्फवृष्टी ४-५ नोव्हेंबरला झाली.

 

आतापर्यंत खोऱ्यात ११५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याआधी १९८६ च्या नोव्हेंबर महिन्यात ११५ मिमी बर्फवृष्टी झाली होती. येथे नोव्हेंबरमध्ये सरासरी  २८ मिमी बर्फवृष्टी होते. याआधी नोव्हेंबर २००४, २००८ व २००९ मध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फ पडला होता. 

 

सिमला : तापमान -३.३ डिग्री
मनालीत किमान तापमान १.२ डिग्री सेल्सियस नोंदले गेले. काल्पामध्येही ७ सेंमी बर्फवृष्टी झाली. लाहौल-स्पीति सर्वाधिक थंडी होती. येथील तापमान ३.३ डिग्रीपर्यंत घसरले आहे. 

 

श्रीनगर : लडाखचा संपर्क तुटला
श्रीनगर- सलग चौथ्या दिवशी लडाख भागाशी काश्मीरच्या खोऱ्यातून संपर्क तुटला आहे. ८६ किमी लांबीचा मुगल रस्ता व काश्मीर-लडाख महामार्गावरील वाहतूक सोमवारपासून बंद आहे. 

 

बद्रीनाथ : ४ दिवसांनी कपाट बंद
डेहराडून-  बुधवारपासून बद्रीनाथ, गंगोत्री भागात बर्फ पडत आहे. २० नोव्हेंबर रोजी बद्रीनाथचे कपाट बंद होणार आहेत. अशा परिस्थितीत भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

बातम्या आणखी आहेत...