आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Kannauj Rose Lehenga And Mangalsutra Design By Sabyasachi Shared Making Video

प्रियांका चोप्राने हिंदू लग्नात घातली होती 22 कॅरेट गोल्डची मुगल ज्वेलरी, 110 कारागिरांनी मिळून 155 दिवसांत तयार केला होता लग्नाचा रेड लहेंगा, मंगळसूत्र आणि लहेंग्याच्या मेकिंगचा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे फोटोज समोर आले आहेत. सोबतच त्यांच्या वेडिंग अटायरशी निगडीत अनेक लहान-लहान गोष्टींची माहितीही समोर येत आहे. डिझायनर सब्यसाची यांनी प्रियांकाने हिंदू वेडिंगमध्ये परिधान केलेल्या रेड लहेंगा आणि मंगळसूत्राचा  मेकिंग व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये लहेंगा बनवण्यासाठी कारागिरांनी घेतलेली मेहनत दिसतेय. सब्यसाची यांनी डिझाइन केलेला लाल कन्नौज रोज लहेंगा बनवण्यासाठी  155 दिवस (3720 घंटों) लागले होते. 110 कारागिरांनी मिळून तिचा हा लहेंगा तयार केला होता. यावर प्रियांकाची मातृभाषा आणि देवनागरी लिपीत पती निक आणि तिच्या आईवडिलांचे नाव लिहिले आहे. या लग्नात प्रियांकाने जपानहून मागवण्यात आलेल्या मोतींपासून तयार झालेली  22 कॅरेट गोल्डची मुगल ज्वेलरी घातली होती.

 

13 वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने वर्तवले होते प्रियांकाच्या लग्नाचे भाकित त्यानेच केला आहे एक दावा...  
-  भारतीय पद्धतीनुसार मुली लग्नानंतर आपले आडनाव बदलतात. ही पद्धत अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही फॉलो केली आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील नावापुढे जोनास हे आडनाव लावले आहे. अलीकडेच न्यूमेरॉलॉजिस्ट संजय जुमानी यांनी सल्ला दिला होता की, प्रियांकाने नाव बदलल्यास तिला भावी आयुष्यात यश आणि सन्मान मिळेल.


- संजय यांनी सांगितले होते की, जर प्रियांकाने तिच्या नावासमोर जोनास आडनाव जोडले तर न्यूमेरॉलॉजीनुसार 19 नंबर जुळेल. हा नंबर यश आणि सन्मानाचे प्रतीक आहे.


- संजय यांनी सांगितले, प्रियांका चोप्राची जन्मतारखेत 9 नंबर हा दोनदा येतो (18+7+1982=9) आणि (1+8=9). ती वयाच्या 36 (9) व्या वर्षी लग्न करत आहे. हे मी 13 वर्षांपूर्वीच सांगितले होते. एका मुलाखतीत त्यांनी प्रियांकाच्या लग्नाविषयी हे भाकित वर्तवले होते. 9 नंबर हा मंगळाचा असतो आणि प्रियांकाच्या बाबतीत हा नंबर दोनदा येतो. प्रियांका स्वभावाने अतिशय महत्त्वकांक्षी आहे.


वेडिंग गाऊनसुद्धा होता युनीक...
- प्रियांकाने ख्रिश्चन वेडिंगवेळी रॉल्फ लॉरेन यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. या गाऊनसोबत 75 फूट लांब दुपट्टा होता. या ड्रेसमध्ये ती लग्नस्थळी दाखल झाली. यावेळी तिची आई मधू चोप्रा तिच्यासोबत होती.


- रॉल्फच्या टीमने प्रियांका आणि निकसोबत त्यांचे पालक, 12 ब्राइड्समेड आणि 12 ग्रूम्समॅन, 4 फ्लॉवर गर्ल्स आणि एका रिंग बॅरियरचा ड्रेस डिझाइन केला होता.  

बातम्या आणखी आहेत...