आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sabyasachi Shares Priyanka Chopra Bridal Look And Nick Jonas Groom Look All Details

नववधू प्रियांकाच्या गोल्ड नेकलेसमध्ये होते जापानहून आणलेले मोती आणि अनकट डायमंड, निकच्या पगडीत लावण्यात आले होते हीरो, डिझायनरने सांगितले कसा तयार झाला मास्टरपीस : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोधपूरच्या उम्मेद पॅलेस भवनमध्ये अमेरिकन सिंगर  निक जोनाससोबत विवाहबद्ध झाला. 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन आणि 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. हिंदू लग्नानंतर निकयांकाचा फर्स्ट लूक समोर आला. हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नात प्रियांकाने डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केलेला कस्टम रेड कलरचा लहेंगा परिधान केला होता. या लहेंग्यावर हॅण्ड एम्ब्रायडरी आणि हँड कट ऑर्गेन्जा फ्लॉवर्स लावले होते. खास गोष्ट म्हणजे हा लहेंगा तयार करण्यासाठी तब्बल  3720 तास अर्थातच 155 दिवसांचा कालावधी लागला होता. सब्यसाची यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भाची माहिती दिली आहे. 


प्रियांकाचा लहेंगा तयार करण्यासाठी कोलकाताहून आले होते 110 कारागिर... 
लहेंग्याच्या सिल्क फ्लॉसमध्ये फ्रेंच नॉट्स होते, सोबतच रेड क्रिस्टल लेअरचे एम्ब्रायडरी वर्क त्यावर केले गेले होते. हा लहेंगा तयार करण्यासाठी कोलकाताहून 110  एम्ब्रायडरी वर्कर्स आले होते. सुमारे पाच महिन्यांच्या मेहनतीनंतर प्रियांकासाठी हा मास्टरपीस तयार झाला. लग्नात प्रियांकाने जी ज्वेलरी घातली होती, त्यावर अनकट डायमंड लावले होते. याशिवाय जापानहून मागवण्यात आलेले मोती आणि 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला होता.  


निक जोनासच्या शेरवानीचे वैशिष्ट्य...
प्रियांकाचा नवरदेव जोनासविषयी सांगायचे म्हणजे, त्यानं लग्नात हाताने तयार झालेली क्रिम कलरची शेरवानी घातली होती. त्यावर हँड  एम्ब्रायडरी असलेला चिकन दुपट्टा  आणि चंदेरी टिश्यू साफा बांधला होता. निकच्या पगडीवर लागलेली रोज कट कलगी आणि डायमंड नेकलेस सब्यसाचीच्या हेरिटेज ज्वेलरी कलेक्शनमधून निवडण्यात आली होती. लग्नात निकयांकाने Christian Louboutin चे शूज घातले होते. 


दिल्लीच्या हॉटेल ताज पॅलेस निकयांकाचे फर्स्ट वेडिंग रिसेप्शन... 
लग्नानंतर निकयांकाचे पहिले वेडिंग रिसेप्शन 4 डिसेंबर रोजी दिल्लीत झाले होते. या रिसेप्शनमध्ये दोघांच्या कुटुंबीयांसह फ्रेंड्स आणि खास पाहुणे सहभागी झाले होते. पीएम मोदींसह काही राजकारणी आणि बिझनेसमन या पार्टीत पोहोचले होते.  

 

फोटो : साभार People Magazine

बातम्या आणखी आहेत...